अकोला :बाल विद्यार्थ्यांनी आपल्या सामाजिक परंपरांचे पालन करावे, नैतिक गुण अंगीकारून समाजाला चांगली दिशा द्यावी. या नैतिक मूल्यांचा विकास व्हावा, या उद्देशाने संत आसाराम बापू आश्रम पातूर रोड येथील भाविकांच्या वतीने आयोजित या मातृ पितृ पूजन पंधरवड्यात विष्णुपंत खेंडकर विद्यालयामध्ये 15 फेब्रुवारी रोजी माता पित्याची पूजा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. अॅड. राजेश इंगळे, प्रा. मालती रोंदळकर यांच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या या शालेय संस्कार अभियानात बाल विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांची पूजा करून त्यांना नमस्कार केला. मातृ-पितृ पूजन करतेवेळी मुलांच्या व आई-वडिलांच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रू आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना परीक्षेचे पॅड मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले. मान्यवरांनी या सामाजिक मूल्यांची उपयुक्तता विशद केली आणि विद्यार्थ्यांना परदेशी संस्कृती विसरून आपल्या पारंपरिक मूल्यांचे नियोजनपूर्वक पालन करून पालकांची सेवा करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन उषा जगदाळे यांनी केले. यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विष्णुपंत खेडकर विद्यालयाचे मुख्याध्यापक निलेश खेंडकर, संत श्री आसारामजी बापू आश्रम अकोला यांच्या मार्फत मार्गदर्शक प्रा. मालतीताई रौंदळकर, संचालक श्री. कृष्णाभाई , व सर्व सेवा धारी टीम सह शाळेतील शिक्षक प्रज्ञानंद थोरात, श्रीकांत पागृत, प्रशांत काळे, गोपाल वानखडे, अश्विनी सोळंके, पल्लवी हिंगणकर, कांचन तायडे, शितल तिवारी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.