तालुक्यात असलेल्या विविध समस्यांना अवगत करण्यासाठी तसेच यावर त्वरित तोडगा न निघाल्यास प्रहार जनशक्ती पार्टीतर्फे विविध समस्यांना घेऊन आंदोलन करण्याबाबतचे निवेदन आज दिनांक 23 मे ला तहसीलदार वरोरा तसेच पोलीस विभागाला देण्यात आले.
वरोरा शहरात मागील आठ ते दहा वर्षापासून ट्रामा केअर सेंटर बांधण्यात आले मात्र ते अजून पावेतो सुरू करण्यात आलेले नाही, तसेच शेतकऱ्यांचा आर्थिक गरज म्हणून प्रोत्साहन पर रक्कम सरकारने घोषित केलेली आहे ती अद्यापही मिळालेली नाही, करंजी ते वरोरा या मार्गावरून अवैध रेती वाहतूक तसेच जड वाहनांनी रस्त्याची दयनीय अवस्था केलेली आहे ती वाहतूक पूर्णपणे बंद करून रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी तसेच शेतकऱ्यांच्या घरात पडून असलेला मालाचे भाव पाडून शेतकरी यांची आर्थिक पिळवणूक करून रासायनिक खतांचे दर वाढवले त्यामुळे होणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान लवकरात लवकर टाळावे, मागील तीन ते चार वर्षापासून कृषी पंपासाठी डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना त्वरित वीज जोडणी करून देण्यात यावी, यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा वरील सर्व मागण्या चार ते पाच दिवसात पूर्ण करण्यात यावा अन्यथा ट्रामा केअर सेंटर ते तहसील कार्यालय वरोरा येथे प्रहार जनशक्ती पक्षातर्फे दिनांक 1 जून 2023, गुरुवारला आंदोलन करण्यात येईल अशा प्रकारचे निवेदन जिल्हाधिकारी यांना तहसीलदार वरोरा मार्फत देण्यात आले या निवेदना संदर्भाची माहिती आमदार बच्चुभाऊ कडू ,राज्यमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार, पालकमंत्री, चंद्रपूर जिल्हा उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा उपविभागीय अधिकारी, वरोरा ,पोलीस निरीक्षक वरोरा यांना देण्यात आले यावेळी प्रहार जनशक्ती पार्टीचे तालुका अध्यक्ष किशोर मधुकर डुकरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते ,शेतकरी उपस्थित होते