शुक्रवार रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन मंगरूळपीर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवचरण डोंगरे पोलीस हवालदार अमोल मुंदे, पोलीस कॉन्सटेबल जितेंद्र ठाकरे, पोलीस कॉन्स्टेबल महंमद परसूवाले हे पेट्रोलिंग करीत असताना गुप्त माहितीच्या आधारे शहापूर मंगरुळपीर येथून आरोपी राहणार सोनखास मंगरूळपीर यांचे ताब्यातील शासनाने विक्रीकरिता प्रतिबंधित केलेला वेगवेगळ्या कंपनीचा गुटखा ज्याची किंमत 45 हजार 328 रुपये चा मुद्देमाल जप्त केला आहे. यावरून पोलीस स्टेशन मंगरूळपीर येथे कलम 188, 272, 273, 328 भांदवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कार्यवाही माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जगदीश पांडे व पोलीस निरीक्षक सुनील हुड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवचरण डोंगरे यांनी केली असून गुन्ह्याचा तपास मंगरूळपीर पोलीस करीत आहे.