श्रीगुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिरामध्ये मल्लखांब, कराटे, प्राणायाम व व्यायाम, तबला व पेटी शिक्षण, भजन गायनाचा सराव, बोद्धिक विषय, थोरांचि व रामायण, महाभारतील गोष्टी, लाठीकाठी, लेझीम, भाषणे, सामुदायिक प्रार्थना, श्लोक पाठांतर, ग्रामगीता वाचन, फायर जंप ईत्यादि शिकविले जाते. यामुळे मुले सुसंस्कारित होतात.
सर्वच ठिकाणी श्रीगुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिरे चालू आहेत. या शिबिरात मुलगा किंवा मुलीला पाठविले तर खूप चांगले संस्कार मुलांवर होतात. प्रत्येक घरात सुसंस्कृत स्त्री असते असे नाही. कुठे सुसंस्कृत स्त्री असते व ती मुलांना उत्तम संस्कार देते. खरे संस्कार मुलांवर आईवडील करीत असतात. आई हे एक नाते नाही तर ते एक आद्य विद्यापीठ आहे व गुरु सुद्धा आहे. जन्माला येणाऱ्या बाळाला आईच्या कृतीतून अनेकदा मार्ग सापडत असतो. मुलांवर योग्य संस्कार झाले पाहिजे. राष्ट्रसंताची ग्रामगीता सांगते.
या कोवळ्या कळ्या माजी ।
लपले ज्ञानेश्वर रविंद्र शिवाजी ।
विकसता प्रगटतील समाजी ।
शेकडो महापुरुष ।।
लहान मुलांना उत्तम संस्कार दिले तर त्यांच्यामध्ये संत ज्ञानेश्वर, रविंद्र आणि शिवाजी लपलेले आहेत. मुलांचा योग्य विकास झाला तर या भारत देशात शेकडो महापुरुष जन्माला येतील.
लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे आईवडीलांनी मुलांसमोर भांडण किंवा शिव्या देऊ नये. तेच अनुकरण मुले पुढे करतात. प्रत्येक आईने स्वयंपाक करताना विठ्ठल नाम, रामकृष्ण हरीचा जप किंवा भजन म्हणत किंवा मोबाईलवर भजने लावावीत. म्हणजे अन्नावर त्याचा उत्तम परिणाम दिसून येईल. स्वयंपाक झाल्यावर देवाला प्रथम नैवेद्य दाखवून जेवण केले पाहिजे.
मुलांनी दुर्जनाची संगत कधी करु नये. दुर्जनाला सुधारण्याचा प्रयत्न जरुर केला पाहिजे. त्यांचे संगतीत मुले बहकतात. उदाः- माझा मित्र लहानपणापासून चोरी करायचा. आता तो चोरीच्या भरवस्यावर श्रीमंत झाला व मोठी माडी बांधून गाडी सुद्धा घेतली. तरीपण त्याने चोरी करणे सोडून दिले नाही. त्याच चोरी करणाऱ्या मित्राने मला जेवायला बोलावले. मी जेवायला गेलो. मला एका चांदीच्या ताटात व चांदीच्या वाटीत जेवण वाढले. मी जेवण केले पण माझ्या मनात चोरीचा विचार आला की चांदीची वाटी धुवून खिशात ठेवावी. कुणाच्या घरी जेवायला जाल तर त्याचे विचार आपल्यात उतरत असतात. जेवण सज्जन व चांगल्या घरी जेवण करावयास जावे.
चांगल्या आईचे उदाहरण द्यायचे झाले तर रामाची आई कौसल्या, कृष्णाची आई देवकी, प्रल्हादाची आई कयाधू तसेच शिवाजी महाराजांची आई माॕ जिजाऊ. या आईंनी मुलांवर सुंदर सुसंस्कार दिले म्हणून रामाचे आदर्श रामराज्य निर्माण झाले. कृष्णाने राजकारभार सांभाळून गीतेचा बोध दिला. चराचरात सर्व ठिकाणी देव वास करतो म्हणून प्रल्हादाने एका खांबातून नृसिंहाला प्रगट केले. प्रत्येक आईने या मातांचा आदर्श घेऊन आपल्या मुलांवर सुसंस्कार घडवावेत. राष्ट्रसंताची ग्रामगीता सांगते.
आजचे सान सान बाल ।
उद्या तरुण कार्यकर्ते होतील ।
गावाचा पांग फेडतील ।
उत्तमोत्तम गुणांनी ।।
लहान मुलांवर उत्तम संस्कार झाले तर ते लहान लहान बालक उद्याचे तरुण कार्यकर्ते होतील आणि गावाच, देशाच भलं होईल. मुले आईवडील यांचे अनुकरण करीत असतात. मुलांनीच नाही तर आईवडीलांनी मासांहार करु नये. उदा- पाकीस्तान मध्ये घडलेली सत्य घटना आहे. ते घर नेहमीच मांस भक्षण करायचे. त्या कुटुंबात तीन मुले होती. वडिलांनी एक कोंबडी आणली. एक सुरी घेऊन मुलांचे वडिल तिसऱ्या मजल्यावर गेले. हे त्याचे दोन मुलांनी बघितले. एक दोन वर्षाचा व दुसरा पाच वर्षाचा होता. ते वडिल काय करतात ते पहावयास गेले. त्यांनी पाहिले की, दोन्ही पाय कोंबडीचे वडिलांनी पायात दाबले व गळ्यावरुन सुरा फिरवला. मुले खाली आले. वडिल मटण घेऊन खाली आले. आणि ते दोन्ही मुले तिसऱ्या मजल्यावर गेले. त्यांना सुरी दिसली. दोन वर्षाचे मुलाचे पाय पाच वर्षाचे मुलाने दाबून धरुन त्याचे गळ्यावरुन सुरी फिरवली. त्याने किंकाळ्या मारल्या. ते त्याचे आईस ऐकू गेल्या. खाली आई पाच महिन्याचे बाळास टोपल्यात पाणी घेऊन आंघोळ घालीत होती. त्या बाळाला टोपल्यात सोडून मांडीवर गेली तर दोन वर्षाचे मुलगा मरुन पडला होता. पाच वर्षाचे मुलाला असे वाटते की, आईबाबा रागावतील व मारतील म्हणून त्याने माडीचे जिन्यातून खाली उडी मारली व तो सुद्धा मेला. आई खाली आली तर टोपल्यातील पाण्यात पाच महिन्याचा मुलगा बुचकळून मेला. शेवटी काय झाले. आईवडील यांनी हे सर्व काही मुलांसमोर करु नये. मुले तसेच अनुकरण करतात. मुलांना सुंदर शिक्षण द्या व उत्तम संस्कार करा. ग्रामगीता सांगते.
आदर्श होतील विद्यार्थी गण ।
गावाचे पालटेल जीवन ।
कोठेच न उरेल गावंढळपण ।
टिकाऊ परिवर्तन यामार्गे ।।
मुलांना संस्कार शिबिरात पाठवावे. त्यामुळे त्यांचे जीवन पालटेल व मुले आदर्श होतील. गावंढळपणा कोठेच दिसणार नाही. मुलांवर आदर्श जीवन जगण्याचा उत्तम मार्ग सापडेल. जयगुरु !
लेखक:-
पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर
श्रीगुरुदेव सेवा मंडळ प्रचारक, यवतमाळ
फोन- 9921791677
आपल्या प्रतिक्रिया द्या....