वरोरा :- वरोरा तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंचाची पंचायत समिती येथे सरपंच कक्ष पंचायत समितीने उपलब्ध करून द्यावा अशी अनेक दिवसापासून मागणी होती. यासाठी तालुक्यातील सर्वच सरपंच आग्रही होते. या मागणीला संवर्ग विकास अधिकारी गजानन मुंडकर यांनी हिरवा कंदील देत दीं.9 ऑगस्ट रोजी सरपंच कक्षाचे उद्घाटन केले.
तालुक्याचे सरपंच संघटनेचे अध्यक्ष विशाल पारखी यांच्या नेतृत्वात गणेश दामोदर चौवले, नर्मदा बोरेकर, देवानंद महाजन, निखिल हिवरकर, नंदलाल टेंमुर्डे, योगेश वायदुळे, नितीन यादव, नितीन खंगार, गणेश माटे, निर्मला दडमल, ताई परचाके, उज्वला थेरे, प्रतिभा मांडवकर, माधुरी घागे, या सर्व सरपंचाच्या उपस्थितीत संवर्ग विकास अधिकारी गजानन मुंडकर यांच्याकडे सरपंच कक्षाची मागणी लावून धरण्यात आली होती. अनेकदा चर्चा करून वरिष्ठ स्तरावर अधिकाऱ्याची चर्चा करून सरपंचांची हि मागणी संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी पूर्ण करीत पंचायत समिती वरोरा येथे सरपंच कक्ष उपलब्ध करून दिला. याबद्दल अध्यक्ष विशाल यांच्यासह अनेक सरपंच उपसरपंचांनी अधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.