कारंजा : सर्वधर्मिय समभावाचे प्रतिक असलेल्या ऐतिहासिक सांस्कृतिक व सर्वधर्मियांचे तिर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कारंजा नगरीत यंदा श्री गणेश विसर्जन व ईद ए मिलाद सण एकाच दिवशी आलेले होते. परंतु मुस्लिम धर्मिय बांधवानी सामंजस्य,शांतता आणि सलोख्याचे दृष्टिकोनातून यंदा ईद ए मिलादचा पवित्र त्यौहार, शनिवार दि.30 सप्टेंबर रोजी करण्याचे आणि दि. 28 सप्टेंबर रोजी श्री. गणेशोत्सवा निमित्त हिंदु बांधवाना सहकार्य करण्याचे ठरवीले.त्याबद्दल सर्वत्र मुस्लिम बांधवाच्या सहकार्या बद्दल त्यांचे आभार मानण्यात येत आहे. तसेच महत्वाचे म्हणजे दि. 28 सप्टेंबर रोजी सर्वत्र हिंदु मुस्लिम एकमेकांना शुभेच्छा देत असल्याचे दिसून येत होते.
गुरुवार दि.28 सप्टेंबर रोजी सकाळी 10 : 00 ते 11:00 च्या सुमारास श्री. गणेशोत्सव विसर्जन मिरवणूकीला प्रारंभ झाला असून,यंदाच्या विसर्जन मिरवणूकीत एकूण 21 सार्वजनिक श्री गणेश मंडळ सहभागी झाल्याची माहिती महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना मिळाली असून,विसर्जन मिरवणूकीत यंदा प्राचिन व पारंपारिक खेळांना श्री गणेश मंडळानी प्राधान्य दिल्याचे दिसून येत होते.त्यामध्ये लोकमान्य गणेश मंडळाचा मल्लखांब विशेष आकर्षण ठरल्याचे दिसून आले. तर लोकमान्य गणेश मंडळ, महात्मा ज्योतिबा फुले मंडळ इत्यादींनी लेझिम खेळाला प्राधान्य दिल्याचे आढळले. मोजक्या मंडळाच्या ढोल पथक आणि डि जे च्या तालावरही काही श्री.गणेशभक्त उत्साहाने थिरकतांना दिसत होते.
स्थानिक शांतता समितीचे पदाधिकारी,आजी-माजी-भावी नगरसेवक,राजकिय कार्यकर्ते तथा सर्वच संघटनाची पत्रकार मंडळी ,पोलीसमित्र यांची मिरवणूकीत उल्लेखनिय उपस्थिती होती.जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनात कारंजाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत कर्तव्यावर असलेले कारंजा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक दिनेशचंद्र शुक्ला यांनी विसर्जन मिरवणूकीच्या मार्गात प्रत्येक चौका चौकात पोलीस दल, राखीव पोलीस, दंगापथक तथा गृहरक्षक दल , पोलीस मित्र यांचा नियोजनबध्द पोलीस बंदोबस्त ठेवल्याचे दिसून येत होते.
रात्री दहा पर्यंत मिरवणूक चालणार असल्याचे दिसून येत आहे. पंचक्रोशीतील ग्राम रुईगोस्ता येथील हवामान तज्ञ गोपाल गावंडे यांच्या अंदाजाप्रमाणे दुपारी 03:30 वाजता पर्जन्यराजाने सुद्धा बापाच्या मिरवणूकीला व्यत्यय न येऊ देता हजेरी लावून श्री गणेशभक्तांचा उत्साहच वाढविला असल्याचे दिसून आले.असे वृत्त प्रत्यक्षदर्शी विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष तथा पत्रकार संजय कडोळे यांनी कळवीले आहे.