राज्य व केंद्र सरकारने भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी आधार कार्डची व्यवस्था केली आज तेच कार्ड आधार कार्ड ओळखपत्र म्हणून उपयुक्त ठरत आहे !
भारत विकसनशील देश आहे काही धनाढ्य सोडले तर भारतात मध्यमवर्गीयांचे व गरिबांचे गरिबीचे प्रमाण जास्त आहे भारतात उपचार पद्धती फार महाग आहे सर्वसामान्यांनी विचार केला आपण आपल्या आजारपणात रुग्णालयात जाऊन उपचार घ्यायचा तर ते त्यांच्या आवाक्याबाहेर बाहेर जाते कारण खाजगी रुग्णालयात गेल्यानंतर आवश्यक असेल तर डॉक्टर विविध चाचण्या करण्यास सांगतात या चाचण्या फार महाग आहेत काही वेळेस चाचण्या करणे अतीआवश्यकही असेल परंतु काही वेळेस रुग्णांना जाणून-बुजून चाचण्या करण्यासाठी आपले चांगभले होण्यासाठी अशी चर्चा नेहमीच असते म्हणून काहीजण आजार ग्रस्त होऊनही अंगावर आजार काढतात रुग्णालयात उपचारासाठी जात नाहीत गंभीर परिस्थिती झाल्यावर रुग्णाला रुग्णालयात नेतात डॉक्टर रुग्णाला शर्तीने वाचवण्याच्या प्रयत्न करतात ही पण काही वेळेस रुग्णाचे शरीर प्रतिसाद देत नाही व रुग्ण दगावतात यामध्ये काही वेळेस रुग्णांच्या नातेवाईकांचा गैरसमज होतो डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्ण दगावला म्हणून त्यातून काही वेळेस रुग्णालयाची तोडफोड डॉक्टरांना मारहाणी करण्याचे प्रकार समोर येतात काही वेळेस डॉक्टरांचा हलगर्जीपणाही कारणीभूत ठरू शकतो रुग्ण दगावण्यासाठी !
महागड्या उपचार पद्धतीमुळे रुग्ण अंगावर दुखणे काढतात बरेचदा परिस्थिती हाता बाहेर जाते हे असे चक्र सुरू आहे हे चक्र भेदण्यासाठी भारत सरकारने प्रत्येक जिल्ह्यात मल्टी स्पेशालिटी सरकारी रुग्णालयाची कोनशीला ठेवून रुग्णालये बांधावीत जेणेकरून प्रत्येक नागरिकांसाठी आरोग्य कार्ड ची योजना राबवता येईल भारतातील प्रत्येक नागरिकाला आरोग्य कार्डची सक्ती करावी आरोग्य कार्डसाठी रुग्णालयात रजिस्ट्रेशन करण्यात यावे व दर सहा महिन्यांनी नागरिकांनी अशा रुग्णालयात जाऊन अल्प दरात रक्त तपासणी पासून हृदयासंबंधी व इतर चाचण्या करवून घ्याव्या नागरिकांना आजार येण्यापूर्वीची लक्षणे दिसली तर ते तशी काळजी घेतील ऍसिडिटी हृदयविकार कॅन्सर किडनीचे आजार व इतर आजारांनी नागरिक त्रस्त होत आहेत मानसिक ताण कीटकनाशकाचा वापर फळांना रासायनिक पद्धतीने तयार करणे या प्रकारामुळे भारतात आजार वाढत आहे !
प्रत्येक नागरिकांच्या नावाने रजिस्ट्रेशन करावे रोज शंभर नागरिकांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन त्याकरिता अल्प असे शुल्क आकारावे दर सहा महिन्यांनी होणाऱ्या चाचण्याचे वेगळे असे अल्प शुल्क असावे यामुळे नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल सरकारी रुग्णालयात करोडो रुपये जमा होतील सहा सहा महिन्यांनी आरोग्य चाचणी झाली तर मधुमेह व इतर गंभीर आजारापासून रुग्ण वाचतील विदेशात नागरिकांच्या आरोग्याची फार काळजी घेतली जाते !
ही योजना अस्तित्वात आली तर नागरिकांना गंभीर आजार येण्यापूर्वीच त्याची कल्पना येऊन आधीच ते स्वतःला सांभाळु शकतील म्हणून प्रत्येक भारतीयांसाठी आरोग्य कार्ड सक्तीचे करावे !
वैद्यकीय शिक्षणाच्या बाजारात शिक्षण कसे स्वस्त होणार तेही बघणे फार गरजेचे आहे कारण हे शिक्षण सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर चे बाहेरचे आहे कर्ज घेऊन डॉक्टर आपली पदवी समाजात सेवेसाठी रजु होतील तेव्हा कर्जाच्या डोंगराखाली दबणाऱ्या डॉक्टरांनी उपचार करताना काय मानसिकता राहील याचा विचार व्हावा आणि काही सामान्य ऑपरेशन असतात त्यांचे दर निश्चित करण्यात यावे एकाच प्रकारचे ऑपरेशन पण विविध डॉक्टर आप आपल्या हिशोबाने रुग्णाकडून पैसे घेतात तेव्हा यात सुधारणा व्हावी वैद्यकीय शिक्षण कसे स्वस्त होणार यावर चिंतन मनन व्हावे विविध राज्यांचे मुख्यमंत्री या क्षेत्रातील तज्ञांची बैठक घेऊन यावर गंभीरपणे विचार करतील तरच या क्षेत्राकडे विद्यार्थी शिक्षणासाठी येतील लोकसंख्या नुसार भारतात डॉक्टरांची आवश्यकता मोठ्या प्रमाणात आहे जनतेच्या आरोग्यासाठी सोयी सुविधा शासनाने पुरविल्याच पाहिजे विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी ते गरजेचे आहे !!
केंद्र व राज्य शासन आता गरीब मध्यमवर्गीय रुग्णांना आजारपणात जरी आधाराचा हात देत असतील तरी पण काही ठिकाणी रुग्णांकडून पैसे मागण्याचे प्रकार आढळून येतात (खाजगी रुग्णालयात) जेव्हा आजारपणात सरकार गरीब व मध्यम रुग्णांना मदत करत असताना रुग्णांकडून का पैसे घेण्यात येतात हा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे !!
खाजगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी रुग्ण भरती झाल्यानंतर रुग्णांसाठी इतके औषधे मागविल्या जातात जशी किराणा सामानाची यादी ? यामुळेही नागरिक हैराण झालेले असतात !! आवश्यक असेल तितकी मागवा आणि पूर्ण किराणासारखी यादी असेल तर रुग्णाला रुग्णांच्या नातेवाईकांना त्या यादीचं पूर्ण विश्लेषण करून समाधान तरी करून द्यावे !!