अथक सामाजिक कार्यामुळे कारंजा तालुक्यातच नव्हे तर वाशिम जिल्ह्यात नावलौकिक प्राप्त असणारी आदर्श जय भारत सेवाभावी संस्था मागील २१ वर्षापासून समाजसेवेत तथा देशसेवेत कार्यरत आहे .अशा लोकप्रिय संस्थेचे अध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर गरड यांनी शनिवारी दि २६ जानेवारी रोजी दुपारी १२ : ०० वाजता,प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शहरातील इण्णांनी जीन येथील शहीद भगतसिंग व्यायाम शाळेच्या प्रांगणात भारतिय जवान आणि किसान यांना मानवंदना देण्याकरीता तसेच भारतिय संविधानाचा जागर करण्याकरीता, देशभक्तीपर गीताच्या बहारदार कार्यक्रमाचे आणि माजी सैनिकांच्या सत्काराचे विशेष आयोजन केले होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई ; शाखा कारंजाचे उपाध्यक्ष तथा विजय शामसुंदर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक मधुकर चाळीसगावकर नगरपरिषद कारंजाचे आरोग्य निरीक्षक विनय वानखडे कारंजा शहरातील सुप्रसिद्ध उद्योजक तथा व्यसनमुक्ती प्रचारक श्री दिलीप गिल्डा, जेष्ठ पत्रकार संजयजी कडोळे , खेर्डा जिरापुरे येथील सरपंच प्रदीप वानखडे श्रीमती शांताबाई गरड यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सर्वप्रथम मान्यवरांचे हस्ते दिपप्रज्वलन व संविधानाचे जनक विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमाचे पूजन व हारार्पण कण्यात आले.कार्यक्रमात आदर्श जय भारत संगीत परिवारातील सभासदांनी देशभक्तीपर गीतांचे बहारदार सादरीकरण करून भारतिय जवानांना मानवंदना दिली . यावेळी डॉ सौ ज्ञानदेवी गरड यांनी आपल्या सुमधूर आवाजातून "ए मेरे वतन के लोगो गीत" गाऊन लतादीदीची आठवण आणून दिली. सौ सौ ज्योतीताई लाठीया गीता काटकर,शारदाताई भुयार , डॉ विनोद इंगळे,मास्टर राहुल सावंत दादाराव सोनीवाळ,विलास ठाकरे रोमिल लाठीया, हफिजखान, डॉआशिष सावजी ,विजय राठोड,नंदकिशोर कव्हळकर , सुनील गुंठेवार , ऍड संदेश जिंतूरकर ,ज्ञानेश्वर गरड यांनी देशभक्तीपर गीताचा नजराना सादर केला तर दिलीपजी गिल्डा यांनी स्वतः लिहिलेली राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित कविता गाऊन सादर केली . प्रजासत्ताक दिना निमित्त कार्यक्रमात बोलतांना संजय कडोळे यांनी सांगितले की, " विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान आणि भारतिय जवानांचे शौर्य व किसानांच्या म्हणजेच शेतकर्याच्या कष्टामुळेच आपण आजचा लोकशाहीचा सण प्रजासत्ताक दिन हा अनुभवत आहोत." संस्थेकडून माजी सैनिक संघटनेचे प्रकाश अर्जुन येवतकर ,गजानन निंघोट , विलास ठाकरे, प्रवीण राऊत , रमेश आढाव ,रविभाऊ गाडगे , राम वराडे ,शिवाजी गायकवाड इ चा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला अनेक रसिक श्रोत्यांची उपस्थिती लाभली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. इम्तियाज लुलानिया यांनी केले तर प्रास्ताविक तथा आभार प्रदर्शन संस्थेचे अध्यक्ष डॉ . ज्ञानेश्वर गरड यांनी केले कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता देवा शिंदे, सुनील गुंठेवार , दत्तात्रय बेलबागकर, मोहम्मद अक्रम ,जुनेद खान, रहीम पप्पूवाले, गजानन कदम तथा संस्थेच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले