परभणी- न्यूज ब्यूरो मधून वृतांकनाचे कार्य करणारे,परभणी येथील ज्येष्ठ पत्रकार,लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे सभासद नुरूद्दीन सिध्दीकी यांना त्यांच्या पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय सेवारत्न पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.मुंबईतील सहारा एज्युकेशन अँड वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने प्रमुख अतिथी,अभिनेता अनिल मोरे,माजी खासदार तुकारामजी रानगे पाटील, अरूण मराठे, माजी नगरसेवक मोहत्रामा मलिका गफार,प्रा.अशोक जोंधळे,व रमाकांत कुलकर्णी यांचे हस्ते त्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
परभणी येथील ग्रीन लिफ हॉलमध्ये झालेल्या एका खास कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.याप्रसंगी शहरातील प्रतिष्ठीत समाजसेवींची बहूसंख्येने उपस्थिती होती. सिध्दीकी यांना प्राप्त झालेल्या या बहूमानाबध्दल त्यांचे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ व त्यांच्या अनेक स्नेहीजनांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.