नागभीड- राज्य परिवहन मंडळाची बस आणि कार यांचेत झालेल्या धडकेत कारमधील दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना नागभीड आरमोरी राष्ट्रीय महामार्गावरील भिकेश्वरजवळ काल दुपारी ४. ३० च्या दरम्यान घडली. येथील ग्रामीण रुग्णालयात जखमींवर प्राथमिक उपचार करून नागपूरला हलविण्यात आले आहे.
गिरिश गिडवाणी हे नागपूरचे व्यावसायिक असून ते चालकासह एम एच ४९ बी बी ०८६९ या कारने व्यावसायिक कामासाठी वडसा ब्रम्हपूरी गडचिरोरीला गेले होते. कामे आटोपून ते नागपूरला परत जात असतांना नागभीडकडून ब्रम्हपुरीकडे जात आसलेल्या एम एच ४० एन ८९४९ या परिवहन मंडळाच्या बससोबत कारची धडक झाली. धडक एवढी जोरदार होती की, या धडकेत कारच्या समोरील भागाचा पूर्ण चेंदामेंदा झाला. बसचेही चांगलेच नुकसान झाले आहे.कारमध्ये असलेल्या गिरिश गिडवाणी आणि चालक कृणाल गंधे यात जबर जखमी झाले. जखमींना तातडीने नागभीड येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर दोघांनाही नागपूरला हलविण्यात आले आहे..