कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : भारतिय हवामान विभाग नागपूरच्या हवाल्याने शासनाने दि. 21 जुलै रोजीच वाशीम जिल्ह्यात रेड अलर्ट घोषीत केलेला होता.यातही महत्वाचे म्हणजे वाशिम जिल्ह्यामध्ये अतिवृष्टिने सर्वात बाधित तालुका म्हणून कारंजा तालुका ठरला आहे.चार जिल्ह्याच्या मध्यभागी असलेल्या कारंजा तालुक्यामधून अडाण,उमा,केदार,बेंबळा इत्यादी नद्याचे प्रवाह जातात. परंतु सिंचना करीता यापैकी कोणत्याच नद्याचे पाणी कारंजा तालुक्याला उपलब्ध होत नाही ही देखील एक शोकांतिकाच म्हणावी लागेल.मात्र कारंजा परिसरात पडलेल्या पावसाने आजूबाजूच्या तिनही ही जिल्ह्यात वाहणाऱ्या,उमा-अडाण-बेंबळा या नद्यांचे पाणी धरणाद्वारे सिंचनासाठी वापरले जात असल्याने आजूबाजूच्या जिल्ह्यांना सुजलाम् सुफलाम् करण्यात कारंजा तालुक्याचा वाटा फार मोठा आहे.चालू आठवड्यात कारंजा तालुक्यात सलग सततधार पाऊस सुरूच असून परिसरातील सर्वच मंडलामध्ये अतिवृष्टिने शेतकऱ्यांची पिके उध्वस्त झालेली असून,अनेकांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत. पावसाने सर्व नद्या नाले धोक्याच्या पातळीवरून वहात आहेत. खेर्डा जिरापुरे येथील नाल्याच्या पुरामुळे, नागपूर-औरंगाबाद महामार्ग,कारंजा ते शेलू साखरा अमरावती मार्ग,पोहा पिंजर मार्ग बंद झाला आहे.पावसामुळे या आठवड्या अगोदर, येवता बंदी आणि विळेगाव येथील दोन व्यक्ती पूराचे बळी सुद्धा ठरलेले आहेत.मात्र या अतिवृष्टिची कारंजा महसूल विभागाचे कर्तव्यदक्ष तहसिलदार कुणाल झाल्टे यांनी गंभिर दखल घेतलेली असून,आपल्या कार्यालयातील सर्व नायब तहसिलदार, मंडल अधिकारी आणि तलाठी यांना अतिवृष्टिने बाधीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे तातकाळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले असून, त्यांनी आपात्कालिन पथकाला पाचारण करून चोविस तास सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.तसेच अडाण धरणाची जलाशय पातळी झपाट्याने वाढतच असल्याने,धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आलेले असून,अडाणनदीत पाणी सोडल्या जात असल्याने मार्गातील नदीकाठावरील लोकांनी सावध राहावे. नदी, नाले,पांदणरस्ते,पुलावरून जाऊ नये.पाण्याच्या प्रवाहातून रस्ता ओलांडून न जाण्याचा इशारा दिला आहे.तसेच संपर्क तुटलेल्या ग्रामिण भागातील गावांशी संपर्क साधणे सुरुच असून,पूरग्रस्त भागातील गंभीर रुग्न,गरोदर महिला,गरजू लोकांना तातडीच्या मदतीकरीता कारंजा तहसिल कार्यालयातील संपर्क फोन न. ०७२५६-२२२१७० ; मोबा. ८२०८५०६९९६. तसेच तहसिलदार मोबा. नं.९९७००१५०६८ नायब तहसीलदार (महसूल) मोबा. नं.९४२०११७१५२ उपलब्ध करून दिलेले आहेत.तरी पूरग्रस्त भागातील ग्रामस्थांनी आपल्या अडचणी समस्या वरील क्रमांकावर कळवाव्यात असे आवाहन तहसिलदार कुणाल झाल्टे यांनी केले आहे.असे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना मिळाले आहे. शनिवार दि. 22 जुलै रोजी तहसिलदार कुणाल झाल्टे यांनी संपूर्ण दिवसभर नारेगाव,मोहगव्हाण,हिवरा लाहे, पिंप्री मोडक,शेमलाई,तांदळी,अंबोडा,हिंगणवाडी,झोडगा,लोणी अरब,मुगूटपूर,लाडेगाव, कामठा,पिंपळगाव,मेहा,बेलखेड, पोहा,कुपटी,कुऱ्हाड,पलाणा,वडगाव रंगे,ब्राम्हणवाडा, औरंगपूर इत्यादी पूरग्रस्त खेडेगावाला भेटी देवून परिसरातील नुकसानग्रस्त शेतजमिनीची पाहणी करीत, शेतकर्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांचे सोबत मंडल अधिकारी,तलाठी होते.असे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....