अकोला : अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यामध्ये असलेल्या उरळ बुद्रुक येथील रंजना सुरेश चव्हाण यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. दि.२७ मे रोजी वयाच्या ५२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रंजना चव्हाण यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा जोपासली आणि त्याचा प्रचार प्रसार केला. त्यांच्या अभंग,भजन गायनामुळे व त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे त्यांचा चाहता वर्ग मोठा होता. त्यांच्या पश्चात ३ मुली, जावई,नातवंड असा मोठा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने कुटुंबासह उरळ बुद्रुक गावावर शोककळा पसरली आहे.