आरमोरी:- श्रीमती अंबाबाई खोब्रागडे शिक्षण सेवा मंडळ, आरमोरी व्दारा संचालीत संताजी महाविद्यालय, आरमोरी जि- गडचिरोली येथे रस्ता सुरक्षा मार्गदर्शन आणि चाचणी शिबीर 30 ऑगस्ट रोजी घेण्यात आला.
या कार्यक्रमाला जिल्हा सहाय्यक परीवहन अधिकारी पवन येवले हे प्रमुख वक्ता म्हणून उपस्थीत होते. तसेच होमगार्ड समोपदेशक अनिल सोमनकर आरमोरी यांनी प्रमुख पाहूने म्हणून उपस्थीती दर्शवली तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान संताजी महाविद्यालयाचे प्राचार्य फाल्गुन नरुले यांनी तर प्रमुख पाहुने प्रा. दौलत धोटे, प्रा. वाढई उपस्थीत होते.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता मा. श्री. येवले सर यांनी विद्यार्थ्यांना वाहन चालवितांना व रस्त्यावरुन चालतांना तसेच वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर वाहन चालक परवाना काढणे सर्वांना सक्तीचे आहे. याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच अध्यक्षीय स्थानावरुन बोलतांना प्राचार्य नरुले सर यांनी सुध्दा वाहन चालवितांना घ्यावयाची काळजी याबद्दल विद्यार्थ्यांना व उपस्थीतांना मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील रा.से. यो प्रमुख प्रा. नैताम सर, प्रा.डॉ. समर्थ सर, प्रा. दुधकुरे सर, प्रा. दोनाडकर सर, प्रा. कु. सोनाली मैंद मॅडम, प्रा. कु. चौधरी मॅडम आणि सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थीत होते.
सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. श्री. जयपाल तुष्ट सर तर आभार प्रदर्शन प्रा. खेडकर सर यांनी केले व कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.