दि.20 मार्च2024 ला जी..वरिष्ठ प्राथमिक मराठी मनभा शाळेला 150 वर्ष पूर्ण झाल्यामुळे सामाजिक उपक्रमात शाळेच्या 150 वा स्थापनेच्या दिवस शतकोत्तर सुवर्ण साजरा करण्यात आला. या शुभ प्रसंगी आयोजित महोत्सव लोगो आणि फलकाचे अनावरण सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा मार्गदर्शन आदरणीय नामदेवरावजी खराटे सर तथा देविदास तायडे सर (अशी होती गढी वरच्या ऐतिहासिक शाळेचे साक्षीदार ) माजी विद्यार्थी माजी सैनिक प्रदीप भाऊ तायडे. यांचे संयुक्त हस्ते करण्यात आले. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेचे पूजन करून शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचे रीतसर उद्घाटन झाल्याची घोषणा सेवानिवृत्त मुख्याध्यापक नामदेवराव खराटे सर यांनी केली. यावेळी फटाक्याची आतिषबाजी करून आनंद उत्सव विद्यार्थ्यांनी साजरा केला. शैक्षणिक वारकरी प्रेरक प्रबोधनात्मक दिंडी द्वारे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवा निमित्य विद्यार्थी रॅली काढण्यात आली. रॅलीला माजी विद्यार्थी अ. भा. नाटयपरिषद नियमक मंडळ सदस्य नंदकिशोर कवळकर यांनी हिरवी झेंडी दाखवली. यावेळी माझी विद्यार्थी. पालक. नागा बाबा वारकरी प्रबोधन दिंडीचे वारकरी. शाळेचे मुख्याध्यापक गजानन चौधरी. पदवीधर शिक्षक माधव येवदेकर . पदवीधर शिक्षक नंदकिशोर भोयर. शिक्षक विश्वनाथ राऊत. शिक्षिका कु. गोदावरी भोयर. कु. आशा काटे. अंगणवाडी सेविका उज्वला गाढवे. रेखा गासे उपस्थित होत्या. ह्या प्रबोधनात्मक सुवर्ण शतकोत्तर रॅलीने मनभा नगरी दुमदुमली. ठिकठिकाणी चौकात भारुड. फुगडी. वर विद्यार्थी. शिक्षकांनी प्रबोधन केले. शतकोत्तर सुवर्ण महोत्सव नियोजित कार्यक्रमात विविध सामाजिक.शैक्षणिक.सांस्कृतिक. जनप्रबोधन. जनजागृती. सांस्कृतिक महोत्सव. दर्पण स्मरणिका. कवी संमेलन. माझी विद्यार्थिनी मन मिलन सोहळा. रक्तदान शिबिर. रोग निदान शिबिर इत्यादी विविध कार्यक्रम सामाजिक बांधीलकीतुन आजी माझी विद्यार्थिनी आखले आहेत. शाळेतील उद्घाटनिय कार्यक्रमाचे संचालन पदवीधर शिक्षक नंदकिशोर भोयर यांनी केले तर आभार प्रशांत ढगे यांनी मानले. आज पासून शतकोत्तर सुवर्ण महोत्सव सोहळ्याला सुरुवात झाली असून विविध सामाजिक. शैक्षणिक. सांस्कृतिक. आजी-माजी विद्यार्थ्यांचे कार्यक्रम या अविस्मरणीय करता येईल यासाठी.. अशी होती गढी वरची ऐतिहासिक माझी शाळा या कल्पनेतून सर्व गावकरी. पालक आजी-माजी विद्यार्थी. शिक्षण परिश्रम करीत असल्याची माहिती प्रसिद्ध प्रमुख सैय्यद फारूक यांना कळविले.