*तुम्ही कोण आहात, यापेक्षा कोण होणार आहात याचा विचार करा.कठोर परिश्रम,सातत्यपूर्ण प्रयत्न आणि चांगले मार्गदर्शन घेण्यावर भर द्या.जितके जास्त कष्ट,तितके मोठे यश मिळवाल.मनापासून प्रयत्न करा. असा मोलाचा संदेश व्याख्याते नितीन बानुगडे पाटील यांनी पालक विद्यार्थी मार्गदर्शन महामेळावा प्रसंगी विद्यार्थ्यांना दिला.
पुणे जिल्हा परिषद,पुणे. (माध्यमिक शिक्षण विभाग) व पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ पुणे शहर व आय.आय.बी.करिअर इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुणवत्ता संवर्धन अभियान अंतर्गत पारितोषिक वितरण समारंभ गणेश कला- क्रीडा रंगमंच सुप्रसिद्ध व्याख्याते व इतिहास अभ्यासक नितीन बानुगडे पाटील ,शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर, आय.आय. बी. इन्स्टिट्यूटचे संचालक दशरथ पाटील, बालाजी वाकोडे पाटील, बनवारीलाल जांगिड नांदेड,ॲड.महेश लोहारे, ॲड. कल्पना लोहारे, दैविक मंठाळे, मुख्याध्यापक संघाचे राज्य सचिव नंदकुमार सागर ,प्रवक्ते प्रसाद गायकवाड, पुणे शहर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शिवाजी शिंदे, सचिव किशोर बोरसे, कार्याध्यक्ष शिवाजी कामठे यांच्या उपस्थितीत पार पडला. पुणे शहर औंध विभागात गुणवत्ता संवर्धन अभियानांतर्गत विद्यापीठ हायस्कूल प्रशालेचा *प्रथम क्रमांक* आल्याबद्दल ट्रॉफी, प्रशस्तीपत्र देऊन मुख्याध्यापक विष्णू मोरे यांचा व्याख्याते नितीन बानुगडे पाटील व शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
3000 पेक्षा अधिक विद्यार्थी, पालक, शिक्षक,मुख्याध्यापक उपस्थित होते.