अकोला : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि वाघांचे होणारे दर्शन यामुळे देश विदेशातिल पर्यटक मोठ्या संख्येने चंद्रपूर लगतच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्प पहाण्या करीता दरवर्षी येत असतात.या व्याघ्र प्रकल्पात पर्यटकाना वाघाचे दर्शन होते. कधी वाघ तलावाच्या थंड पाण्यात झोपलेला असतो.तर कधी कधी रस्त्यावर बसलेला असतो.तर कधी चालत जात असताना दिसतो.तर केव्हा आपल्या वाहनासमोर उभा दिसतो.
अंधारी नावाच्या नदी वरुन याला अंधारी नाव पडलेले आहे. आम्ही अकोला येथील जेष्ठ नागरिकांनी नुकतीच येथे जाण्याकरीता ऑनलाइन बुकिंग केली.व पर्यटन केन्द्राच्या जिप्सी मधून भ्रमंती करायला निघाले. भ्रमंती करीत असतांना मार्गात सुंदर वातावरण ,शुद्ध हवा .अश्या सुंदर वातावरणामधे फिरत असतांना त्यांना ऊंच ऊंच उड़या मारणारे हरिण, त्यांचे गोजीरवाणे पाडस, हरिणाचे कळप,मोर ,जंगली कोंबडा,चवसिंगा,जंगली गव्हा, माकड , बगळे व लहान पक्षी दिसले .परंतु ही मंडळी वाघाचे दर्शन घेण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होती .थोड्या वेळाने त्यांची जिप्सी एका ठिकाणी उभी राहिली . त्यांच्या मागे व पुढे चार ते पांच जिप्सी उभ्या होत्या काही वेळानंतर त्यांच्या जिप्सी समोरून वाघ रस्ता पार करतांना दिसला . त्या वेळेस त्यांच्या मध्ये चलबिचल सुरु झाली . सोबत असलेल्या गाईडन काही सूचना दिल्या. अगदी जवळून व्याघ्र दर्शन झाल्याने आमचे येणे सार्थ झाले असे आम्हाला वाटले . अशी प्रतिक्रिया ,महाराष्ट्र राज्य राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती संघटनेचे अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक अशोक रामटेके यांनी व्यक्त केली . त्या नंतर पुन्हा आम्ही पाण्याच्या ठिकाणी गेलो असता तेथे आम्हाला दहा मिनिटांनंतर पुन्हा पाण्यामधे पोहतांना व पुढे जातांना वाघ दिसला.त्याच क्षणी आम्ही त्याचा फ़ोटो काढला . आम्हाला दोन वेळा वाघाचे दर्शन झाल्या मुळे आम्ही आंनदित झालो . नंतर आम्ही फिरत असतांना आम्हाला अनेक प्रकारची वनऔषधी करिता उपयोगी असणारे अनेक झाड़ दिसले यामधे मग़रीच्या पाठी सारखे दिसणारे झाड़ , कात्याचे झाड़ , तेंदुपत्ता झाड़ ,चारोली ,आंवला ,बीबा , मोहाचे ,गराड़ी ,रात्रिला चमकनारे करुचे झाड़ , अमलतास ,काटेसावरी असे एक ना अनेक विविध प्रकारचे उपयोगी असणारे झाडे दिसले आम्हाला गाईडने त्यांची माहिती दिली .
यामधे आमची वेळ कशी निघून गेली .आम्हाला समजले सुद्धा नाही असे या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प भ्रमंती मधे सहभागी असलेले अकोला येथील डॉ सुरेश कुमार सिंघल ,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक रामटेके ,हर्ष कुमार तिवारी ,विजय कुमार सातवजी यांनी महाराष्ट्र राज्यस्तरीय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना कळवीले असून ताडोबाला बाय बाय करत पुन्हा येऊ म्हणत आम्ही घराकडे परतत असल्याचे सांगितले आहे .