वाशिम : गेल्या पाच वर्षात महागाईने प्रचंड उच्चांक गाठलेला असून तुटपुंज्या मानधनात आपली गुजराण (उदरनिर्वाह व औषधोपचार) करतांना वयोवृद्ध कलावंताच्या नाकीनऊ येत आहेत.त्यातच मागील काही वर्षात येऊन गेलेल्या,कोव्हिड 19 कोरोना महामारी आल्यापासून, कलाकारांच्या लोककलेच्या कार्यक्रमात कमालीची घसरण होऊन,लोककलेचे पारंपारिक कार्यक्रम बंद पडल्यात जमा झाल्याने,पारंपारिक कलाकारांवर तर उपासमारीचे संकट कोसळत असून,या महागाई आणि बेरोजगारीने पारंपारिक लोककलेच्या व इतरही कलेच्या कार्यक्रमावर उदरनिर्वाहाकरीता अवलंबून असणाऱ्या,सर्वच कलाकारांना जीवन जगणेच कठीन होऊन गेलेले आहे. त्यामुळे वृद्ध कलाकाराकडून वेळोवेळी,महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या तुटपुंज्या मानधनात वाढ व्हावी.अशी मागणी संपूर्ण महाराष्ट्रातून वेळोवेळी होत असतांनाही शासनाचे मात्र या विषयाकडे अक्षम्य दुर्लक्ष्य असून,शासन लोककलेच्या कलाकाराबाबत उदासिन असल्याने, कलाकारामध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे.या पार्श्वभूमिवर अनेकवेळा विदर्भ कलावंत संघटना कारंजा यांनी, वृद्ध कलकारांचे मानधन वाढवण्याची मागणी केली असून, महारा आमदारांनी विधानसभेत कलाकाराच्या समस्या बाबत लक्ष्यवेधी मांडण्याची विनंतीही केली आहे.परंतु ना याकडे कुण्या आमदाराचे लक्ष्य आहे ? ना सांस्कृतिक मंत्री सकारात्मक आहेत ? त्यामुळे आता विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांनाच साकडे घातले असून,वृद्ध कलाकाराच्या मानधनात वाढ करून सरसकट सर्व कलाकारांचे मानधन दरमहा किमान पाच हजार रुपये करण्याची मागणी केलेली असून, मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे साहेब लोकसभा निवडणूकीच्या आचार संहितेपूर्वी,वृद्ध कलाकार मानधन वाढीचा निर्णय घेणार काय ? याकडे कलाकारांचे लक्ष्य लागले आहे.