श्री.साईबाबा ग्रामीण विकास संस्थाद्वारा संचालित महिला महाविद्यालय गडचिरोली येथील भूगोल विभाग बीए फायनलच्या विद्यार्थिनींनी 5 एप्रिल रोजी
मेंढालेखा या गावाचे भूगोल विभाग प्रमुख तथा प्रभारी प्राचार्य डॉ. योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनात सर्वेक्षण करून येथील ग्रामसभेचे स्वरूप जाणून घेतले.
सर्वेक्षणादरम्यान समाजसेवक देवाजी तोफा यांनी मेंढा लेखा गावाची वैशिष्ट्ये सांगताना शेतजमिनीवर व्यक्तिगत व जंगलावर सामुहिक हक्क या गावाने प्राप्त केला आहे. गावाच्या परिसरातील वनावर सामुहिक हक्काचा दावा मान्य करून घेणारे "मेंढा लेखा"हे देशातील पहिले गाव ठरले आहे. मेंढा लेखा हे गाव महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील गाव आहे. गडचिरोली शहरापासून 28 किलोमीटर अंतरावर आहे. या गावाची लोकसंख्या जेमतेम 500 च्या आसपास आहे. गावातील वनक्षेत्र 1,806 हेक्टर तर शेतीचे क्षेत्र 87 हेक्टर आहे. शेत जमिनीवर व्यक्तिगत व जंगलावर सामुहिक हक्क या गावाने प्राप्त केला आहे. गावाच्या परिसरातील वनावर सामुहिक हक्काचा दावा मान्य करून घेणारे "मेंढा लेखा" हे देशातील पहिले गाव ठरले असून हा दावा 28 ऑगस्ट 2009 रोजी मान्य झाला असल्याचे तोफा यांनी यावेळी सांगीतले.
13 डिसेंबर 2009 ला तत्कालीन राज्यपालांच्या हस्ते सामूहिक वनहक्क अभिलेख ग्रामसभेला देण्यात आला. या Mendhalekha Village गावातील ग्रामसभेचे महत्त्व त्याचे अधिकार आणि अंमलबजावणी हे सारेच मेंढालेखाने संपूर्ण देशाला दाखवून दिले आहे. विद्यार्थी सर्वेक्षक यांनी प्रत्येक कुटुंबाचा सर्वे करून गावाची प्रगती जाणून घेतली. या गावाचे आदर्श पुढे ठेवून इतर गावांचा विकास करण्याबद्दलची जनजागृती अभियान राबवण्याचा संकल्प विद्यार्थी दशेतून घडू शकते, असे मत डॉ. योगेश पाटील यांनी मांडले. सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी भूगोल विभागातील विद्यार्थिनी आणि डॉ. कुंदन दुफारे आणि व लेखा गावातील गावकरी यांचे सहकार्य लाभले.