सहकार महर्षि कै.डॉ. अण्णासाहेब कोरपे यांच्या जन्मशताब्दी वर्ष निमित्त अकोला-वाशिम जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्यात.कारंजा येथील स्वातंत्र सेनानी श्री.क.रा.ईन्नानी महाविद्यालयामध्ये आयोजित वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यानी “भारताच्या सर्वांगीण विकासात युवकांची भूमिका" या विषयावर आपले विचार परखडपणे मांडलेत.
या स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एन. देवरे होते.तर प्रमुख अतिथि म्हणून ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे, जन्मशताब्दी मोहोत्सव समिति सचिव बी.जे.काळे, “सास" या सामाजिक संघटनेचे शाम सवाई बंडूभाऊ इंगोले होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.डॉ.नांदगावकर यांनी केले.या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक सार्थक रमेश बोंते, दूतिय क्रमांक प्रांजली राजेंद्र हांडे,तृतीय क्रमांक गौरी दिपक गावंडे यांनी पटकावला.सर्व स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. डॉ.विवेक हिवरे व प्रा.सुधाकर रोडे यांनी कामकाज पाहिले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता बँकेचे उपमुख्याधिकारी कवी रवींद्र महल्ले,राजु डाबेराव, सचिन बांडे यांनी परिश्रम घेतले. व प्रा.डॉ.के.जी.राजपूत,प्रा.डॉ. राजगुरे,प्रा.डॉ.श्रीमती ए. बी. गूल्हाने ,प्रा. डॉ. राठोड यांनी सहकार्य केले.