ब्रम्हपुरी तालुक्यातील झिलबोडी येथील संजय राहाटे वय ४० वर्ष हे लकवाग्रस्त असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. मात्र त्यांचे कुटुंब मजुरी करून उदरनिर्वाह करत असल्याने व घरातील कर्ता पुरुषच लकव्याने आजारी असल्यामुळे वैद्यकीय उपचार करतांना व कुटुंबाचे पालनपोषण करतांना त्यांना आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
सदरची बाब झिलबोडी येथील ग्राम काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फतीने राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन, बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. विजयभाऊ वडेट्टीवार यांना कळताच त्यांनी सदर इसमाला उपचाराकरिता १० हजार रोख रक्कम च्या स्वरूपात आर्थिक मदत पाठवली.
सदरची आर्थिक मदत देताना माजी जि. प. सदस्या सौ. स्मिताताई पारधी, झिलबोडी चे उपसरपंच कैलासजी खरकाटे, बोरगावच्या सरपंच सौ. मेघाताई पिंपळकर, झिलबोडी ग्राम युवक काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष मंगेश शेंडे, मालडोंगरीचे माजी सरपंच राजेशजी पारधी, झिलबोडीचे माजी सरपंच दादाजी राहाटे आणि नरेशजी शेंडे यांची यावेळी उपस्थिती होती.