नांन्होरी गावातील सुभाष चौक ते आंबेडकर चौक येथे दोन्ही बाजूने बंधिस्त नालीचे बांधकाम करण्यासाठी आमदार किर्तिकुमार भांगडीया यांच्या निधीतून बांधण्यात आलेल्या नालीचे काम अर्धवट ठेवण्यात आलेले आहे. गावातील सुजाण नागरिकांनी अर्धवट अवस्थेत असलेले काम पुर्ण करण्यात यावे यासाठी ग्रामपचायत येथे विंनती अर्ज दाखल केले. परंतु नालीचे बांधकाम आजतागात पूर्ण झालेले दिसून येत नाही.
सदर बांधकाम करतांना बंधिस्त नाली असायला हवी परंतु तेथे असे काहीच दिसत नाही. यावरून काम पूर्ण झाल्याचे दाखवून कामाचा आराखडा बोर्ड तयार करून लावण्यात आलेला आहे. शासन या बाबीची दाखल का घेत नाही असा प्रश्न आम आदमी पार्टी तालुका अध्यक्ष दिलीप प्रधान यांनी उपस्थित केला आहे आणि ग्रामपंचायत येथे सरपंच ग्रामसेवक आणि सदस्य अशा अर्धवट कामांना दुजोरा का देतात असा प्रश्न गावातील जनमानसांत निर्माण झालेला आहे