चंद्रपूर दि. 1 एप्रिल: चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील भिसी येथे नवीन अपर तहसिलदार कार्यालय सुरू करण्यात आले असून अपर तहसिलदार, भिसी यांना नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रापुरते अधिकार प्रदान करण्याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये दि. 2 फेब्रुवारी 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर शासन अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या www.dgps.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. असे जिल्हाधिकारी कार्यालयातील सहायक अधीक्षक सचिन पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.