कारंजा : स्थानिक - स्टेट बँक समोरील डॉ. अण्णाभाऊ साठे चौकाची स्थापना दिनांक ११/०१/२००३ रोजी,स्थानिक नगर पालिका कारंजा यांच्या पुढाकाराने करण्यात आली होती.या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष
नरेंद्रशेठ गोळेच्छा व उद्घाटक म्हणून अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री मा.ना.प्रा. लक्ष्मणराव ढोबळे,विषेश अतिथी श्री प्रकाशदादा डहाके, ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे, सेवाव्रती ज्ञानेश्वर खंडारे इत्यादींच्या उपस्थीत व प्रकाशदादा डहाके यांच्या शुभहस्ते फलकाचे अनावरण करण्यात आले होते. त्यानंतर तब्बल २२ वर्षांनी या चौकाचे सौंदर्यीकरण व फलकाचे अनावरण येथील सामाजीक कार्यकर्ते व माजी विस्तार आधिकारी सुधाकरराव जाधव यांचे हस्ते करण्यात आले. त्यानिमित्त दिनांक १/१/२०२५ रोजी सकाळी ९ वाजता येथील सामाजीक संस्था आदिगुंज व सामाजीक समता प्रबोधन' मंच आदिगुंज बहुउद्देशीय संस्था कारंजा व सर्व स्तरातील समाज बांधव यांच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांची १०५ की जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.यावेळी डॉ. रमेश चंदनशिव,व्यसनमुक्ती सेवा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग जनसेवक तथा ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे,डॉ. कुंदन श्यामसुंदर ,हंसराज शेंडे, गजानन अहमदाबादकर,प्रा. झोंबाडे सर डॉ.वासुदेव भगत,प्रणिता दसरे,मंगलताई संझाड,संतोष शेगोकार,श्रीकांत भाके साहेब उपाध्यक्ष नाट्य परिषद कारंजा शाखा, सदस्य नाट्य परिषद नियामक मंडळ मुंबईचे नंदकीशोर कव्हळकर , यांनी यांच्या मनोगतातून त्यांनी लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाला जिग्नेश लोढाया,आकाश कर्हे, प्रविण दिहाडे, रामदास इंगोले, प्रदीप वानखडे ,कैलाश बोनके, अरविंद गवई ,विनोद धाकतोड, रामेश्वर जोंधळे, कमलेश धनगावकर, कैलाश हांडे, शामराव धनगावकर ,देवराव राऊत, सिद्धार्थ नवघरे, पत्रकार उमेश अनासाने,गोपी डेंडुळे, एस.एस. चव्हाण,अनिल डेरे, राजू अवताडे, प्रमोद धनगावकर, आदित्य खंडारे, रामेश्वर जोंधळे शेषराव चव्हान,गणेश झोंबाडे, संतोष शेगोकार, कार्यक्रमाचे सूत्र संचलन आणि आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजक तथा आदीगुंज संस्था अध्यक्ष ज्ञानेश्वर खंडारे यांनी केले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....