चिरोली पोलिस चौकी हद्दीत अवैध दारू विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी धाड टाकून १४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. स्वप्नील चरणदास भंडारी (२५, रा. दाबगाव ) याला ताब्यात घेतले असून, साईनाथ फकिरा राऊत (४१, रा. चिरोली) हा पसार झाला.
चिरोली येथे देशी दारू विक्रीचे अधिकृत दुकान असतानाही परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू आहे. याची माहिती चिरोली पोलिस पोलिस उपनिरीक्षक यांना मिळताच त्यांनी धाड टाकून देशी, विदेशी दारू जप्त केली.