वाशिम : 2ऑक्टोबर या महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून " स्वच्छता ही सेवा 2023 " हा उपक्रम (एक तारीख-एक तास) 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम एक तास संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.या उपक्रमांतर्गत शहरी आणि ग्रामीण भागात प्रत्येक वॉर्ड व ग्रामपंचायतीमध्ये 1 तास श्रमदानाद्वारे स्वच्छता करण्यात येणार आहे.
हा उपक्रम राबविण्याकरीता वॉर्ड व ग्रामपंचायतीअंतर्गत जास्त कचरा असलेले क्षेत्र,रेल्वे स्टेशन,बसस्थानके, राष्ट्रीय व राज्य महामार्गाच्या शेजारील जागा,जलस्रोत,नदीघाट, झोपडपट्ट्या,पुलाखालच्या जागा, बाजारपेठा,गल्ल्या,धार्मिक स्थळे, सार्वजनिक व खाजगी कार्यालयांचे परिसर,पर्यटन स्थळे, टोलनाके,प्राणी संग्रहालये,गोशाळा,रहिवाशी क्षेत्र, आरोग्य संस्थाच्या आसपासचा परिसर,अंगणवाडी परिसर,शाळा व महाविद्यालय परिसर अशा ठिकाणाची हा उपक्रम राबविण्यासाठी निवड करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांनी केले आहे.
प्रत्येक वॉर्डात दोन ठिकाणी व प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एका ठिकाणी उपक्रम राबविण्याचे निर्देशित दिले आहे.स्वच्छता उपक्रमांतर्गत गोळा केलेल्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याकरीता कचरा प्रक्रिया केंद्रावर वाहून नेण्याची व्यवस्था करण्यात यावी.
या उपक्रमांतर्गत संपूर्ण शासकीय यंत्रणा,कलाकार,लेखक,साहित्यकार यांनी मोठ्या संख्ये या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे.असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले असल्याचे विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कळविले आहे
आपल्या प्रतिक्रिया द्या....