कारंजा : स्थानिक वाल्मिकनगर निवासी नागरिकांचे वतीने,सोमवार दि.15 ऑगस्ट रोजी ठीक सकाळी 8 : 00 वाजता,माजी नगराध्यक्ष दत्तभाऊ डहाके यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले.प्रमूख उपस्थित मध्ये माजी नगरसेवक मा. सलीम गारवे प्रमुख उपस्थितीत संपन्न करण्यात आला. सदरहु राष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक सामाजिक कार्यकर्ते गोपिभाऊ डेंडुळे, नितीन नरवाले यांनी आयोजीत केला होता. कार्यक्रमांतर्गत सर्व प्रथम भारतमाता, छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन व हारार्पण करण्यात आले. त्यानंतर माजी नगराध्यक्ष अरविंद लाठीया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येऊन राष्ट्रध्वजाला अभिवादन करून सामुहिक राष्ट्रगीत घेण्यात आले .गोपीनाथ डेंडूंळे यांनी सर्व मान्यवरांचे पुष्गुच्छ देऊन स्वागत केले. "हर घर तिरंगा घर घर तिरंगा " या शासनाच्या आदेशानुसार संपूर्ण वाल्मीक नगर परिसरातील प्रत्येक घरावर दिनांक 13 ते 15 ऑगस्ट पर्यंत ध्वज फडकविताना दिसले . कार्यक्रमाला कालू जमादार, देविदास ढीके, रमेश देंडवाल, मधूजी चावरे, रवी धामणे, रवी जयदे, दीपक गोहर, बाबु पिवाल, विक्की सारवण, कन्हैय्या जयदे, संतोष घारू, राजेश डेंडुले, चेतन सारवण, मदन नरवले, व समस्त वाल्मिकी मेहतर समाज बांधव उपस्थित होते .