चंद्रपूर - तुकुंम दुर्गापूर मार्गावर असलेल्या शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयाच्या समोर एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह जळालेल्या स्थितीत आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली आहे.
अंदाजे 55 ते 60 वर्षे असलेल्या अज्ञात व्यक्तीचा खून करून जाळून टाकण्यात आला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे . या संदर्भात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.