वाशीम : महाराष्ट्रातील पत्रकारांची सर्वात मोठी संघटना असलेल्या,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी सर्वानुमते वाशीम येथील, सेवाव्रती सामाजिक कार्यकर्ते तथा झुंजार पत्रकार निलेश पूनमचंद सोमानी यांची अविरोध निवड करण्यात आली. पुणे येथील मोरेश्वर सभागृह येथे 28 जानेवारी 2025 रोजी पत्रकार संघाच्या राज्यस्तरीय पदाधिकारी बैठक व पद नियुक्ती सोहळा कार्यक्रम पार पडला.
याप्रसंगी जर्नालिस्ट पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक अशोकरावजी वानखेडे, राजकीय विश्लेषक ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई, पत्रकार संघटनेचे संस्थापक व राज्य संघटक संजय भोकरे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकोडे, राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे व डिजिटल सोशल मीडिया प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे समवेत सर्वच मान्यवरांची उपस्थिती होती. संघटनेच्या राज्यस्तरीय पदाधिकारी बैठकीत हा नियुक्ती सोहळा हर्षोल्सासात पार पडला यावेळी नवनिर्वाचित प्रदेश कार्याध्यक्ष निलेश सोमानी यांना परिषदने भव्य सन्मानचिन्ह, सन्मानपत्र ,श्री साईबाबाची भव्य संगमवरी मूर्ती ,भक्ती व शक्तीची संगम असलेली छत्रपती शिवाजी महाराज व संत नामदेव महाराज यांची आकर्षक मूर्ती, शाल, श्रीफळ ,दुपट्टा व आरोग्यवर्धिनी खोबरा व खारीकची भव्य माळ देऊन सत्कार करण्यात आला. अनेक वर्षानंतर विदर्भाला या निवडीमुळे न्याय मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे माजी विदर्भ अध्यक्ष बाळासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनात सोमानी यांनी या संघटनेची सर्वप्रथम वाशिम जिल्हा अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली होती.त्यानंतर अमरावती विभागाचे अध्यक्ष पद त्यांना देण्यात आले.सोबतच त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना विदर्भ अध्यक्ष पदाची जबाबदारी देखील त्यांनी सांभाळली. पत्रकार संघाने,दीक्षाभूमी ते मंत्रालय पर्यंत निघालेल्या विशाल अशा पत्रकार संवाद यात्रेमध्ये सोमानी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली होती. त्यानंतरच शासनाने पत्रकार महामंडळाची स्थापना केली शिवाय पत्रकारांसोबतच वृत्तपत्र विक्रेता महामंडळाची सुद्धा स्थापना केली आहे, सदर कार्यात विदर्भातून सोमानी यांची महत्त्वपूर्ण भूमिका ठरलेली होती.त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रदेश कार्याध्यक्षपदी जबाबदारी देण्यात आली आहे.सदर निवडी बद्दल सोमानी यांचे महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषद वाशिम आणि विदर्भ लोककलावंत संघटना वाशीमचे अध्यक्ष सेवाव्रती संजय कडोळे यांनी अभिनंदन केले आहे.