कारंजा-: राज्य विज्ञान शिक्षण संस्था रविनगर, नागपूर, शिक्षण विभाग जि. प. वाशीम, शिक्षण विभाग पं. स. कारंजा, वाशिम जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ व ब्ल्यु चिप कॉन्व्हेंट कारंजा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 29 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता कारंजा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे बक्षिस वितरण थाटात संपन्न झाले. सदर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात श्री. बाबासाहेब धाबेकर विद्यालयाचा वर्ग 9 वीचे विद्यार्थी रोहित गोपाल ठाकरे व कुणाल लक्ष्मण इंगोले यांनी तयार केलेल्या कंपरटेबल हॉस्पिटल बेड या प्रयोगाला चौथा क्रमांक प्राप्त झाला. त्यामुळे त्याची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.
प्रदर्शनीच्या समारोपीय कार्यक्रमाला अध्यक्ष व बक्षिस वितरक म्हणून कारंजा तहसीलचे तहसीलदार धिरजजी मांजरे,आदिशक्ती संस्थेचे संचालक प्रो.निर्मलसिंह ठाकुर,विद्याभारती विज्ञान महाविद्यालयाचे माजी प्रा.डॉ. आर. सी. मुकवाने, ब्लू चिप कॉन्वेंटच्या मुख्याध्यापिका संगीता परळीकर,विज्ञान अध्यापक मंडळाचे अमरावती विभागीय सचिव मनिष गावंडे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी रोहित गोपाल ठाकरे व त्याचे मार्गदर्शक शिक्षक विजय भड यांना तहसीलदार धिरजजी मांजरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे अध्यक्ष केशवराव खोपे, संस्थेचे संचालक देविदास काळबांडे, मुख्याध्यापक विजय भड, शिक्षक राजेश शेंडेकर, गोपाल काकड, अनिल हजारे, शालिनी ओलिवकर, शिक्षकेत्तर कर्मचारी भालचंद्र कवाणे, राजेश लिंगाटे, राजु लबळे, राजेंद्र उमाळे तसेच गावकरी मंडळींनी कौतुक केले असल्याचे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरीय करंजमहात्म्य पत्रकार परिषदेला मिळाल्याचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले आहे.