ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी तालुक्यातील बोरगाव गावाकडे येण्या-जाण्यासाठी बांधकाम विभागाकडून काही वर्षाअगोदर कोल्हापुरी बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले. बंधाऱ्याची उंची कमी असल्याने नागरिक पाणी कमी असल्यानतंर जिव धोक्यात घालून जिवघेणा प्रवास करतात. या मार्गाने बोरगाव, उदापुर, झिलबोडी, परसोडी, नवेगाव, व इतर जवळील गावातील नागरिक येणे-जाणे करतात. या बंधाऱ्याला लागुन कंपनी असल्याने अनेक मजुर रात्री-बेरात्री ये-जा करतानी मोठी दुर्घटना होऊ शकते. याची शक्यता नाकारता येत नाही. बोरगाव ,झिलबोडी,परसोडी,नवेगाव,सोनेगाव,सावलगाव,येथील नागरिकांना तालुक्यात जाण्यासाठी मार्ग कमी अंतरावर असल्याने याच मार्गाने ये-जा करत असतात.
त्यामुळे बंधाऱ्याला कठडे नसल्याने अपघात होऊन भुतीनाल्यात पडण्याची भीती आहे. याकडे लोकप्रतिनिधी चे किंबहुना लक्ष नाही.
गोसीखुर्द कालव्याच्या धरणाचे सत्तावीस दरवाजे उघडले असल्याने या बंधाऱ्यावरून केव्हा पाणी ओलांडून फेकेल काही सांगता येत नाही. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पुर्णपणे दुर्लक्ष होत आहे.
संबंधित क्षेत्राचे लोकप्रतिनिधी यांनी संबंधित विभागाकडून या बंधाऱ्याला कठडे लावण्याचे काम करण्यात येऊ शकते. पण संबंधित लोकप्रतिनिधी ला क्षेत्रात लक्ष द्यायला वेळ नसल्याने नागरिकांना अशा प्रकारे जिवघेणा प्रवास करावा लागतो आहे. अनेक वर्षे झाली. या बंधाऱ्याला कठडे नाही. पण लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. कठडे नसल्याने कधीही अनुचित घटना घडु शकते. लोकप्रतिनिधी व बांधकाम विभाग एखाद्याचा जीव गमवावा लागेल तेव्हा जाग येणार आहे का असा प्रश्न नागरिकांत निर्माण होत आहे. लोकप्रतिनिधी यांनी पुढाकार घेऊन बांधकाम विभागाने त्वरित कठडे लावण्यात यावे. नाही तर अनुचित घटना घडु नये म्हणून याकडे जाणिवपूर्वक लक्ष देण्यात यावे अशी मागणी नागरिक करत आहेत.