कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे): पंचवटी नगर येथे कारंजा येथील स्थानिक श्री पंचवटी मंडळाचे माजी सदस्य श्री १००८ आचार्य गिरनार सागरजी महाराज यांचा जन्म उत्सव पंचवटी नगर येथे दिनांक १ जुलै रोजी रात्री १० वाजता करण्यात आला. सर्व प्रथम राळेकर सर याच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले मंडळाचे अध्यक्ष कृष्ण देशमुख यांच्या हस्ते हारार्पण करण्यात आले व मंडळाचे उपाध्यक्ष सुधीर घोडसाड यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.मंडळाचे कोषाध्यक्ष दिपक रामदेवकर यांच्या हस्ते केक कापून जन्म दिवस साजरा करण्यात आला. मंडळाचे सचिव संदेश ठाकूर यांच्या हस्ते मानवंदणा देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन बंटी गाडगे यांनी केले. मंडळाचे माजी अध्यक्ष चंदू टाके यांच्या हस्ते थंड पेय वाटण्यात आले. कार्यक्रमाला सुनील डाखोरे, अरुण घोडसाड, गोविंदराव रामदेवकर, शाम टाके, सुनील काकड, अजाबराव चौधरी, अतुल खरडकर, गिरीश राळेकर, नरेश गजभिये, कपिल गजभिये, अमोल गुगळे, संतोष गुगळे, चेतन महात्मे, चिंटू धुमाळे, शाम तायडे, मोहन पंडित, सोनी लाला, गजानन घोडसाड, अनिल लोंदे, गुलाबराव पापळे, वैभव डाखोरे, सौरभ डाखोरे, अजय जिरापुरे, किशोर गुगळे, विवेक डोणगावकर, वैजेश डोणगावकर, सोनू भेलोंडे, सतीश ठकणाईक, प्रवीण करडे, प्रवीण घोडसाड. गोकुळ साखरकर, ओम साखरकर, सुरेश चातुरकर, भरत राऊत, विलासराव गावंडे,शाम तायडे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन अभिजित ठणगण यांनी केले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....