8 सप्टें.आंतरराष्ट्रीय साक्षरता साक्षरता दिनाचे औचित्य साधून हितकारिणी उच्च माध्य विद्यालय आरमोरीच्या वतीने बर्डी परिसरात रॅली काढून साक्षरतेविषयी जनजागृती केली.
स्वाभिमानाने जगण्यासाठी शिक्षणाची गरज असून घरातील प्रत्येक सदस्य साक्षर व्हायला पाहिजे असे मत विद्यालयाचे प्राचार्य जय फुलझेले यांनी मांडले.त्यानंतर उच्च विद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून बर्डी परिसरात रॅली काढण्यात आली.
साक्षरतेविषयी घोषवाक्याने बर्डी परिसर दुमदुमला.रॅलीला विद्यालयातील प्रा.कु.शेंडे,प्रा.मेश्राम, प्रा.प्रधान,प्रा.सहारे,प्रा.सेलोकर,प्रा.कु.सारवे यांनी सहकार्य केले.