ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी तालुक्यातील अवघ्या दोन किमी अंतरावर असलेल्या झिलबोडी येथील लोकसंख्या तिनशे असुन या छोट्याशा खेड्यात जन्म झालेले व बालपण सुध्दा या गावाच्या मातीत घालवणारे. झिलबोडी गावात मुळात त्यांना टोपन (नानु) ह्या नावाने प्रसिद्ध आहेत. त्याचे नाव ज्ञानेश्वर मुखरूजी डांगे असुन त्यांना बालपणापासूनच कलाकारी व फोटोग्राफी हा छंद जडला असल्याने त्यानी प्राथमिक शिक्षण घेताना अनेक पथनाट्य, गित गायनाचे कार्यक्रमात हेवाहेवीने भाग घेत असत. काही कालांतराने त्यांनी स्वतः ताचा फोटोग्राफी शॉप नागभीड येथे सुरू केले. मागील सत्तावीस वर्षापासून ते नागभीड येथे वास्तव्यास आहेत. पण त्यांनी झाडीपट्टीतील रंगभूमीवर आपले खूप मोठे नाव लौकिक केले आहे. एक कलाकार म्हणूनच नाही तर ते दिग्दर्शक म्हणून सुद्धा कामे केली आहे. या झाडीपट्टीतील रंगभूमीवर सन दिनांक १४ एप्रिल १९८९ ला संगीत घंगरू, या नाटकापासून सुरवात केली. नंतर त्यांनी संगीत संभा बेलदार,गरिबाचा कैवारी,का गरिबाचे रक्त पिता,रक्ताची तहान,पुढाऱ्याची ऐशी- तैशी,सौभाग्यदान,आकित नाकोशी,शापीत,वनवा पेटला क्रांतीचा,का दिला जन्म मला,पोर फाकडी हजार लफडी,असुनी नाथ मी अनाथ,लेक विकली बापाने,ग्रहण लागल घरट्याला,पोर ममतेच्या,खबरदार मामाजी,घडला चमत्कार पोर्निमेला, मी भुकेला ममतेचा,अशा ३५० ते ३७५ नाटकात भूमिका केल्या आहेत. आणि हे सर्व प्रयोग चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर येथे नाटकाचे प्रयोग झाले असून मागील कोरोना काळात नाटके प्रयोग बंद करण्यात आले होते.
पण आता सध्या कोरोना काळ संपल्यानंतर पुन्हा झाडीपट्टीतील रंगभूमीवर नाटकाना सुरवात झाली आहे. (नानु ) यांनी अनेक झाडीपट्टीतील रंगभूमीवरील नाटकाचे दिग्दर्शक, व विनोदी भूमिका, नटसम्राट, म्हणून प्रसिद्ध आहेत. यांच्या या भुमिकेची चर्चा नाट्यक्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. त्यांची मधुर वानी व मनमिळाऊ स्वभावाने त्याच्या चाहत्यांची दिवसेंदिवस वाढतच आहेत. या शिवाय भारतीय फिल्म व टेलिव्हिजन संस्थान पुणे येथून प्रारंभीक फिल्म अभिनय कोर्स सन २०१८ मध्ये पूर्ण केल्यामुळे नाट्यकलावंत, दिग्दर्शकाच्या भुमिकेत समाज जागृती, व्यसनमुक्ती, कला पथक, जनतेचे समाज प्रबोधन मनोरंजन करित असुन त्याच्या नावाचा झाडीपट्टीतील रंगभूमीवर बोलबाला आहे. अशा महान कलाकाराचा झिलबोडी येथील मातीत उगम झाल्यामुळे या अनमोल हिऱ्यांची सर्वत्र चर्चा सुरू आहे. सदर मुलाखत आमच्या प्रतिनिधींनी घेतली असता झाडीपट्टीतील रंगभूमीवर काम करताना त्याच्या झालेल्या नाट्यप्रयोग मुळे त्यांना गौरव पदक व प्रशस्तिपत्र मिळाले आहे. अशा या झाडीपट्टीतील रंगभूमीवरील झिलबोडी येथील मातीत जन्मलेल्या हिऱ्याने विदर्भात मोठे नाव लौकिक केले आहे.