शहापूरमध्ये अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. येथे एका क्रूर बापानेच आपल्याच आठ वर्षीय मुलाची निर्दयपणे हत्या केल्याची घटना घडली आहे. पत्नीसोबत झालेल्या भांडणाचा राग या नराधमाने आपल्या मुलावर काढला. या क्रूर बापाने आपल्या 8 वर्षाच्या मुलाला तोंडात बोळा कोंबून त्याची हत्या केली आहे.
ही घटना समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी बापाला अटक केली आहे. एकनाथ नामदेव गायकवाड (59) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कौटुंबिक हिंसाचाराची ही घटना शहापूर तालुक्यातील वाशाळा खुर्द गावात घडलीय आहे. कोणत्या तरी कारणावरून एकनाथ गायकवाड याचं त्याच्या पत्नीसोबत कडाक्याचं भांडण झालं होतं. भांडणानंतर एकनाथ हा खूप संतापलेला होता.
हाच संताप त्याने आपल्या आठ वर्षीय मुलावर काढला. पत्नीसोबत भांडण झाल्यानंतर संतापलेल्या एकनाथने आपल्या मुलाच्या तोंडात कागदाचा बोळा कोंबून त्यांची हत्या केली
दरम्यान, याप्रकरणी कसारा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेच्या काही तासानंतरच आरोपी बापाला पोलिसांनी अटक केली. एकनाथ नामदेव गायकवाड याने आपल्या मुलाची हत्या का केली? त्यावेळी नेमकं काय घडलं होतं? याचा तपास पोलीस करत आहेत