"लाठीया" परिवारचा कित्येक पिढ्या पिढ्या पासून सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल नेहमीच नावलौकिक राहिलेला आहे. आजच्या पिढी पासून तिन पिढ्यापूर्वी कारंजा शहरात सर्वत्र "मनसुखसेठ लाठीया"यांचा कारंजा तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण अकोला जिल्ह्यातून नावलौकिक होता. मुरब्बी सामाजिक कार्यकर्ते आणि धाडसी राजकारणी म्हणून ओळख असलेल्या मनसुखसेठ लाठीया यांना भेटण्या करीता, पत्रकार संजय कडोळे यांनी सांगीतलेल्या माहितीप्रमाणे प्रत्यक्ष जिल्हाधिकारी त्यांना भेटण्या करीता, त्यांचे निवासस्थानी येत असत. पंचक्रोशितील ग्रामिण भागामध्ये त्यांच्या शब्दाला फारच सन्मान होता. त्यामुळे कित्येक गावगाड्याच्या भानगडी त्यांच्या शिष्टाईने त्याकाळी मिटविल्या जात असत. आणि अशाप्रकारे तंटामुक्तीचे बहुमोल कार्य मनसुखसेठ लाठीया यांनी त्याकाळी केले होते. तुळजापूर येथून वेगळे निघालेले ग्राम शिवनगर करीता त्यांच्याच प्रयत्नांनी तत्कालिन जिल्हाधिकारी यांनी जागा मिळवून दिलेली होती हा त्यांच्या कार्याचा बहुमोल असा इतिहास असल्याचे सुद्धा पत्रकार संजय कडोळे आहे. पुढे त्यांच्या सामाजिक कार्याचा वारसा त्यांचे ज्येष्ठ सुपूत्र माजी नगराध्यक्ष बटुकसेठ उर्फ अरविंद लाठीया यांनी चालवीला. उत्कृष्ट शेतकरी, उद्योजक आणि यशस्वी राजकारणी अशी त्यांची कारकिर्द आहे. आणि आता लाठीया परिवाराच्या तिसऱ्या पिढीचा दिपक असलेले मनसुखसेठ लाठीया यांचे नातू आणि अरविंद लाठीया आणि सौ दिनाबेन लाठीया यांचे चिरंजीव असलेले रोमिल लाठीया सुद्धा आपला व्यवसाय उत्कृष्टपणे सांभाळून उर्वरीत वेळेत तळागाळातील गोरगरीबाच्या विविध समस्या सोडवून, सामाजिक कार्यात विशेष रुची घेत आहेत.

"पिंटूसेठ' या टोपण नावाने ओळखल्या जाणाऱ्या रोमिल लाठीया यांचा आज वाढदिवस असून त्यांचा जन्म दि १८ नोहेंबर १९७९ रोजी झाला. लहानपणी ते आजोबा मनसुखसेठ लाठीया यांचे लाडके नातू म्हणून प्रसिद्ध होते. त्यामुळे शालेय शिक्षण घेत असतांनाच त्यांना आजोबा कडून समाजकार्याचे बाळकडू मिळाले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यामुळे बालपणीच ते कला किडा सांस्कृतिक क्षेत्रात रमले व पुढे त्यांनी हाच छंद जोपासला . हे विशेष. ज्या मित्राला त्यांनी जीव लावला त्याचेवर जीव अगदी ओवाळून टाकला. असा मनमिळाऊ स्वभाव असल्यामुळे कारंजा येथे त्यांचा फार मोठा मित्रपरिवार आहे.अडल्या नडल्यांना आणि विशेष करून, दुर्धरआजारग्रस्तांना मदत करणे हे त्यांचे आवडीचे समाजकार्य ! "बल तो बल - अपना बल" या स्वस्वभावाने ते स्वकतृत्वावर आदर्शवादी जीवन जगत आहेत. व जगता जगता परमार्थ साध्य करीत आहेत. आपल्या गावातील मायबहिणींना रोजगार मिळावा म्हणून त्यांनी हजारो महिलांना काम देण्या करीता स्वतःचा अगरबत्ती उद्योग सुरु केला होता. परंतु आकस्मिक पणे आलेल्या कोव्हिड१९ कोरोना महामारी काळात त्यांना कारखाना बंद करावा लागला होता .

परंतु एकदा आणखी लवकरच त्यांचा अगरबत्ती उद्योग सुरु होणार आहे . कोरोना काळात त्यांनी स्वखर्चाने कित्येक रंजल्या गांजल्या, परागंदा झालेल्या मजूरांकरीता जेवणावळ्या देऊन, आर्थिक मदत देऊन त्यांच्या राज्यात गावाकडे रवाना केले. देशाभिमान असणाऱ्या सेवाव्रती रोमिल लाठीया यांनी, भारतिय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त सुद्धा इन्नानी जीन येथे फार मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते .गीतगायन व सांस्कृतिक कार्यक्रमाची विशेष रुची असल्याने ते विविध सांस्कृतिक सामाजिक संघटनांशी जुळले आहेत. यातूनच त्यांनी सांस्कृतिक कला नगरी कारंजा शहरामध्ये जिवलग मित्र डॉ. इम्तियाज लुलानिया यांच्या मित्रत्वातून, "ईरो फिल्मस् एन्ड एन्टरटेन्टमेन्ट" ची सन् २०१७ मध्ये स्थापना केली. त्याद्वारे लोकजागृती करून, प्रत्यक्ष शासनाला त्यांच्या राष्ट्रिय कार्यक्रमात सहकार्य करण्याकरिता, "जय हो स्वच्छ भारत अभियान" हा लघुचित्रपट बनविला. या चित्रपटात त्यांनी आपल्या निर्मिती मधून, पडद्यावर प्रत्यक्ष राष्ट्रपिता महात्मा गांधी, प्रकाश गवळीकर यांच्या भुमिकेतून जीवंत साकारला. कर्मयोगी संत गाडगेबाबा, शिवमंगल आप्पा राऊत यांच्या भूमिकेतून प्रत्यक्ष दाखवीले. समशेरखान या कलावंताच्या भूमिकेतून, खळखळून हसविणारा जोकर दाखवीला तर दत्तात्रय बेलबागकर यांच्या सेवा परमो धर्म: च्या भूमिकेतून सच्चा सफाई कामगार दाखवीला. शिवाय छोट्याशा लघु चित्रपटामधून विविध , विविध धर्मी, विविध रंगी, विविध ढंगी संपूर्ण भारतिय संस्कृतिचे विशाल दर्शन घडवीत जगाला राष्ट्रीय एकात्मता व स्वच्छतेचा संदेश दिला. अखेर त्यांच्या निर्मितीची या "जय हो स्वच्छ भारत अभियान" चित्रपटाची दखल घेणे प्रलक्ष महाराष्ट्र शासनाला भाग पडले आणि शासनाने जिल्हाधिकारी यांचे माध्यमातून त्यांना तत्कालिन पालकमंत्र्याचे हस्ते रोख बक्षिस, सन्मानपत्र व शिल्ड देऊन गौरवांकित केले. परंतु याचे श्रेय त्यांनी आपल्या लघुचित्रपटाकरीता काम करणाऱ्या आपल्या शेकडो सहकाऱ्यांना देऊन, ईरो फिल्म्सू एन्ड एन्टरटेन्टमेन्ट च्या सर्व कलावंताचा गुणगौरव करीत त्यांना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविले. अशा सामाजिक कला,अभिनय क्षेत्रात दिग्गज कामगिरी करणारा हा कलावंत मित्रांच्या प्रेरणनेने आणि व्यसन मुक्ति सम्राट हभप मधुकर महाराज खोडे, व्यसनमुक्ती प्रसारक दिलीपजी गिल्डा तथा व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त संजय कडोळे तसेच जिवलग मित्र डॉ इम्तियाज लुलानिया यांच्या प्रेरणेने, व्यसनमुक्तीचा वसा घेत व्यसनमुक्ती कार्यातही व्यसनमुक्ति प्रसारक डॉ ज्ञानेश्वर गरड , व्यसनमुक्ती पुरस्कार प्राप्त संजय कडोळे,राहुल सावंत, नंदकिशोर कव्हळकर, गोपीनाथ डेंडूळे, सुनिल काटकर, देविदास नांदेकर, ऍड संदेश जिंतुरकर, राजिकशेख, हफिजखान, मिंटू सागाणी, हार्दिक मेहता, विमल बरडीया, राजू रायचूरा, किरीट रायचूरा, कपिल महाजन, डॉ किशोर जेसवानी, विजय खंडार, सुनिल गुंठेवार, उमेश अनासाने, मोहित जोहरापूरकर यांचे सोबत समाजसेवेत सक्रिय झाला आहे. त्यांचे तळागाळातील लोकांवरील प्रेम आणि कलेची आवड बघून आता तर त्यांची पत्नी सौ ज्योती रोमिल लाठीया तसेच चिमुकली मुले चि . दर्श आणि मुलगी कु.रिया सुद्धा त्यांना त्यांच्या गायनकलेमध्ये साथ द्यायला लागले आहेत. आज रोजी , ईरो फिल्मस् एन्टरटेन्टमेन्ट, आदर्श जय भारत सेवाभावी संस्था,विदर्भ लोककलावंत संघटना, शहिद भगतसिग व्यायाम शाळा, लोकमान्य टिळक नवदुर्गा उत्सव समिती, गुजराती गरबा उत्सव समिती, नवरंग गरबा ग्रुप मध्ये कार्यरत असलेले, पिटूंसेठ उर्फ रोमिल लाठीया यांचा आज जन्मदिवस त्यानिमित्त अशा सेवाभावी, उमद्या, दिलदार, रुबाबदार, अष्टपैलू नेतृत्वाला माझ्या खूप खूप शुभेच्छा ...! ... !! ....!!!
आपल्या प्रतिक्रिया द्या....