चंद्रपूर : कोव्हिड 19 कोरोनाचे सावट 100 % संपल्यामुळे, महाराष्ट्र शासनाने कोरोनाचे सर्वच प्रतिबंध मागे घेतलेले आहेत . त्यामुळे लग्नाचा हंगाम असल्यामुळे, अगदी धार्मिक व पारंपारिक रितीरिवाजाप्रमाणे धुमधडाक्यात विवाह होतांना दिसत आहेत . चंद्रपूर जिल्हयातील मातृभक्तांचे आराध्य दैवत श्री महाकाली मातेच्या गोंधळ जागरणा करीता विशेष करून वाशिम जिल्हयातील कारंजा (लाड) येथील राष्ट्रीय समाज प्रबोधनकार असलेले गोंधळी लोककलावंत संजय कडोळे ( मो नं..८२६३०३९३२७ मो . नं . ९०७५६३५३३८) यांना वाढती मागणी आहे . याबाबत अधिक वृत्त असे की, सर्वसाधारणपणे हिंदु धर्मियांचे कुळदैवत म्हणजे श्रीक्षेत्र तुळजापूरची श्री तुळजा भवानी, श्रीक्षेत्र जेजुरगडचे खंडेराया किंवा मल्हारी मार्तंड - बानू म्हाळसा, श्रीक्षेत्र पालेपिंपळचे ज्योतिबा राया, श्रीक्षेत्र बहिरमचे बहिरीनाथ असून या देवाला पारंपारिक लोककलावंत गोंधळी - वाघ्यामुरळी यांचेकडून गोंधळ - जागरण घालवून, नववधू किंवा नवरदेवाला हळद लागण्यापूर्वी कुळदैवताला भंडारा (हळद) वाहण्याची व गोंधळ जागरणामध्ये दिवटी (मशाल) प्रज्वलीत करून त्यावर तेल जाळून देवाला प्रसन्न करून घेण्याची प्रथा असते . त्यामुळे सध्या संपूर्ण विदर्भासह कारंजा पंचक्रोशीत "गोंधळ - जागरण" कार्यक्रमाला उधाण आलं असून ,कारंजा येथील महाराष्ट्र शासन प्राप्त गोंधळी लोककलावंत, संजय कडोळे यांच्या जय भवानी जय मल्हार गोंधळ जागरण कला संचाला वाढती मागणी होत असून चंद्रपूर / नागपूर परिसरात त्यांचे कार्यक्रम होत आहेत असे वृत्त अजय जहाँगीरदार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवीले आहे .