राहुल रामटेके
तालुका प्रतिनिधी,नागभिड
नागभीड: अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमेटीच्या व्दारा नागभीड तालुका काँग्रेस कमेटी तर्फे केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल,गँस,खाद्यतेल व इतर जिवनावश्यक वस्तूची सातत्ताने वाढ करून सामान्य जनतेची लूट करत आहेत. पाच राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या वेळी पराभवाच्या चिंतेने पेट्रोल, डिझेल, गँस, खाद्यतेल यांचे भाव रोखून धरले होते.परंतू निवडणूका संपताच पुन्हा दरवाढ करून जनतेस लुटन्यास सुरवात केली.खाद्यतेल व इतर जिवनावश्यक वस्तुचे मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सर्वसामान्याचे जगणे मुष्कील झाले आहे, अशा या केंद्रातील भाजप सरकार विरोधात आवाज उठविण्यासाठी "महागाई मुक्त भारत" आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.या आंदोलनात नागभीड तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने नागभीड शहरातून बाईक रँली व गँस सिंलेंडरला हार घालुन राममंदिर चौक नागभीड येथे केंद्रातील भाजपा सरकार विरोधात नारेबाजी करून रोष व्यक्त करण्यात आले.
या आंदोलनात तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रमोद चौधरी, शहरअध्यक्ष डाँ.रविंद्रजी कावळे,सचिव दिलीप मानापूरे, कार्याध्यक्ष गणेश गड्डमवार, उपाध्यक्ष रमेश ठाकरे, न.प.नगरसेवक दिनेश गावंडे, नगरसेवक संजय अमृतकर, सरचिटनिस रामकृष्ण देशमुख, नगरसेवक प्रतिक भसिन,चिमुर विधानसभा युवक काँग्रेस महासचिव अमोल वानखेडे, नगरसेविका आशा गायकवाड, सुनंद माटे, सारिका धारणे, नागभीड समन्वयक हरिष मुळे, यशवंत समर्थ, संजय माकोडे, नाशीर शेख,पुरूषोत्तम पराते, प्रदिप येसनसुरे,अनिल माथनकर, वासुदेव मोहुर्ले,भाष्कर मेश्राम, महेशभाऊ कुर्झेकर,रविंद्र बळी, फुलदासजी उंबरकर, एन.एस.यु.आय अध्यक्ष सुरज चौधरी,सेलोकर भाऊरावजी पांडव, नंदकिशोर गायकवाड, पंढरीजी समर्थ तसेच काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थीत होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....