अकोला:- रावेरी येथील प्रसिद्ध सीता मातेचे मंदिर यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुका अनेक संतांच्या पदस्पर्शाने पावन झालाय त्यामुळे या तालुक्यातील एक तालुक्याला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे रावेरी येथील प्रसिद्ध सीतामाता मंदिर असून आजनसरा येथील भोजाजी महाराजांची मंदिर संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे श्री रावेरी येथे जगातील एकमेव सीतामाईचे मंदिर सीता मंदिर तीर्थक्षेत्राचे महात्म्य श्री क्षेत्र रावेरी हे गाव यवतमाळ जिल्हा तालुका राळेगाव वरून दक्षिणेस तीन किलोमीटर आहे या गावाला पौराणिक ऐतिहासिक इतिहास लाभला आहे त्रेता युगात रामायण कालीन इतिहासाप्रमाणे अयोध्येचे राजा दशरथ त्यांचा पुत्र प्रभू रामचंद्र व लक्ष्मण सीतेसह 14 वर्षाच्या वनवास असताना रावणाने सीतेचे अपहरण करून लंकेमध्ये अशोक वनात ठेवले होते प्रभू रामचंद्र आणि रावणाचा पराभव करून सीतेला आयोध्येत परत आणल्यानंतर पावित्र्या बद्दल शंका निर्माण झाली सीतेने अग्नि परीक्षा देऊन पवित्र सिद्ध केले परंतु समाजातील कोणत्याही व्यक्तीचे समाधान झाले नाही प्रभू रामचंद्र आणि समाजाची सुव्यवस्था राखण्यासाठी सीतेला गरोदर अवस्थेत लक्ष्मणाच्या रथात बसून दंडकारांना सोडून दिले श्री शेत्र रावेरी गावातील पूर्वजांपासून वयोवृद्ध मंडळी याबद्दल अशी आख्यायिका सांगतात की जेव्हा रामाने सीतेला गरोदर अवस्थेत वनात सोडून दिले तेव्हा सीतेने याच रावेरी गावात वाल्मीक ऋषींचे आश्रयाने वास्तव केले रावेरी हे गाव आणि आसपासचा परिसर हा दंडकारण्याचा भाग असून याच गावात लवकुश यांचा जन्म झाला लवकुशाचा जन्म झाल्यानंतर सीतेने गावातील लोकांकडे पसाभर गहू मागितला गहू देण्यास लोकांनी नकार दिल्यावर तिने गावकऱ्यांना शाप दिला की या गावात गहू पिकणार नाहीत शाप प्रमाणे या गावात गहू पिकत नव्हता परंतु अलीकडे सण 1900 च्या दरम्यान गावातील लोकांनी सीतेला साकडे घालून पिकलेला गहू सीतामाता मंदिरात भेट दिल्याशिवाय आम्ही गव्हाचा एकही दाणा खाणार नाही असा संकल्प करून तो संकल्प वार्षिक पाळल्यामुळे गावात गहू पिकण्यास सुरुवात झाली आणखीही एक कहानी आहे की रामाचा अश्वमेघ नावाचा घोडा लवकुशांनी अडवला आणि त्या घोड्याबद्दल बरोबर आणले आलेल्या शत्रुघ्न लक्ष्मण यांचा पराभव करून घोड्याबरोबर आलेला हनुमंताला वेलीने बांधून ठेवले रावेरी गावात वेलीने बांधलेल्या स्थितीत नऊ फूट उंचीची हनुमानाची भव्य मूर्ती आहे ज्या ठिकाणी लवकुशाने अश्वमेघ घोडा पकडला ते ठिकाण तमसा नदीचे रामगंगा तीरावर आजही पाहण्यास मिळते गावाच्या दक्षिण भागात कडून तमसा रामगंगा नदीचे वळण असून उत्तर वाहिनी असलेल्या नदीचे तीरावर जगातील एकमेव वनवासी सीतेचे हेमाडपंथी मंदिर आहे तसेच बाजूला वाल्मीक रुषीचा आश्रम सुद्धा आहे.
शिवाजी महाराजांचे कालखंडातील पाच मोठे बुरुज गढी व त्याला भिंतीचा असलेला परकोट आजही पाहण्यास मिळतो रावेरीचे प्रसिद्ध सीता मंदिर सीता मंदिरात महादेवाची मोठी पिंड असून तेथे सीता नाणी आहे तसेच नाणी घरात नदीचे पाणी ज्या गोमुखातून पडते ते गोमुखाही आहे हनुमंताचे मोठे मंदिर असून त्यात बांधलेल्या अवस्थेत हनुमंताची नऊ फूट उंच मूर्ती आहे मंदिर परिसरात हा अतिशय सुंदर असून हनुमान जयंती व सीता नवमी येथे मोठे कार्यक्रम होतात बाराही महिने येथे नागरिक दर्शनासाठी येतात व स्वयंपाक करतात रावेरीला आता पर्यटनाचा दर्जा मिळाला असून रावेरी हे मोठे पर्यटन केंद्र म्हणून उदयास येत आहे. अशी माहिती अध्यक्ष रावेरीकर देशमुख यांनी दिली.