ब्रम्हपुरी(दि.7नोव्हेंबर):- तालुक्यातील मालडोगरी येथील शेतकरी महिला फुलाबाई पटवारी मेश्राम यांच्या शेतातील धान नुकतेच कापून पूजना तयार करण्यात आला होता. काल दि.05/11/2022ला रात्री अंदाजे11वाजताच्या दरम्यान जाळला असावा अंदाज वर्तविला जात आहे.सकाळी काही शेतकरी आपल्या शेतावर गेले असता माहिती मिळाली. तिन एकराला चे धान पीक होते.
लावलेल्या आगीत संपूर्ण धानाचा पूजना जळून खाक झाला आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. हाती आलेल्या पिकाची विदोहीं लोकांनी धानाचा पूजना जाळून खाक केले. त्यामुळे शेतकरी महिला फुलाबाई मेश्राम यांच्यावर मोठे संकट आले आहे. शेतकरी महिला फुलाबाई यांना शासकीय मदत देण्यात यावी व जाळण्याऱ्या चोराचा शोध घेऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे