कारंजा:-
आगामी श्री गणेशोत्सव २०२२ च्या, पार्श्वभूमीवर रविवारी, कारंजा शहर पोलिस स्टेशनतर्फे श्री महेश भवन येथे शांतता कमेटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते . या बैठकीला श्री गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, सर्व राजकिय पक्ष कार्यकर्ते, सर्वधर्मिय समाजसेवक,पत्रकार बंधु प्रामुख्याने उपस्थित होते .

बैठकीच्या अध्यक्षस्थानी, कारंजाचे तहसिलदार धिरज मांजरे तर प्रमुख उपस्थिती मध्ये, उपविभागीय पोलिस अधिकारी जगदिश पांडे, शहर पोलिस निरीक्षक आधारसिह सोनोने, पिएसआय वाघमोडे तथा महावितरणचे देशपांडे हजर होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना आधारसिह सोनोने म्हणाले की, "श्रींच्या विसर्जना करीता प्रशासनातर्फे आम्ही चोख व्यवस्था, पोलिस बंदोबस्त, सि सि टी व्ही व ड्रोन कॅमेर्या द्वारे पाहणी इ व्यवस्था केलेली आहे त्यामुळे शांती, सलोखा, सदभावना राखून सर्वांनी श्रींचा उत्सव पार पाडावा. तसेच अनुचित प्रकार होणार नाही याची प्रत्येकाने खबरदारी घ्यावी." देशपांडे म्हणाले की, गणेशोत्सव मंडळात महावितरणकडूनच विज घ्यावी व मंडपात शॉर्ट सर्कीट होणार नाही म्हणून तज्ञ व्यक्तिंकडून व्यवस्था करावी ." उप पो .अधि. जगदिश पांडे म्हणाले की, गेल्या काही दिवसा पासून मी पाहतो आपले कारंजा शहर स्वच्छ सुंदर शहर असून येथील शांती सलोखा भाईचारा एकात्मता चांगली आहे. तसेच याप्रसंगी कारंजेकरांतर्फे एड संदेश जिंतुरकर, मौलवी ईमदात खान, माजी उपाध्यक्ष जुम्माभाई पप्पूवाले, बिसुभाई पहेलवान,माजी नगरसेवक प्रसन्ना पळसकर जाकीर शेख, महिला प्रतिनिधी मधून राधाताई मुरकुटे, ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे, शेकुवाले, सुनिल डाखोरे इत्यांदीनी मनोगत व्यक्त केले. आपल्या अध्यक्षीय संभाषणातून बोलतांना तहसीलदार धिरज मांजरे यांनी कारंजा शहर शांती सलोख्याचे प्रतिक असून कारंजातील सर्वच धर्माची मंडळी प्रशासनाला सहकार्य देऊन सहकार्य करतात त्याबद्दल कौतुक केले. संजय कडोळे यांनी "श्री गणेश विसर्जन मार्गा मधील रस्त्याचे खड्डे थातुर मातुर काम न करता, डांबरीकरणाने बुजवीण्याची स्थानिक प्रशासनाला विनंती केली आणि आमच्या कारंजा शहरातील शांती सलोखा सर्वधर्म समभाव अबाधित असून, श्री गणेश मिरवणुकीत स्थानिक मुस्लिम मंडळी कडून दरवर्षी प्रत्येक गणेश मंडळाच्या मिरवणुकीवर गुलाब पाकळ्यांची उधळण आणि मंडळाचा सत्कार केल्या जात असल्याची माहिती दिली तसेच यावर्षी प्रत्येक मंडळाला उत्कृष्ठ असे गौरवपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे सांगितले." यावेळी भारत गॅसचे शेखर बंग यांनी प्रत्येक गणेश मंडळाला निर्माल्य गोळा करण्याकरीता टप देण्याचे सांगतांना, यंदाचा गणेश पर्यावरणपूरक करावा . गणेश मुर्ति सोबत निर्माल्य न टाकता नगर पालिकेच्या निर्माल्य कलश रथा मध्ये घ्यावे असे सांगीतले ." या कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचलन सर्वधर्म समभाव संस्थेचे श्याम सवाई यांनी केले तर आभार प्रदर्शन पिएसआय वाघमोडे यांनी केले . कार्यक्रमाला माजी अध्यक्ष अरविंद लाठीया, विजय बगडे, संजय काकडे, ललित चांडक, पत्रकार आरिफ पोपटे, कारंजा पत्रकार मंचाचे दिलिप रोकडे, एकनाथ पवार, संजय कडोळे, शेकुवाले, राजु श्यामसुंदर, हरदिप पिंजरकर, हाफिजभाई विजय खंडार दाऊद मुन्निवाले इत्यादी सह कारंजेकर नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते .
आपल्या प्रतिक्रिया द्या....