कारंजा (लाड) : संपूर्ण विश्वातील दत्त उपासकांचे आराध्य दैवत असलेल्या,कारंजा नगरीतील,दत्तावतार श्री.नृसिह सरस्वती स्वामी महाराजांवर देश विदेशातील करोडो दत्त उपासकाची श्रद्धा असल्यामुळे, स्वामी दर्शनाला कारंजा नगरीमध्ये भाविकांची नेहमीच वर्दळ असते.सदरहु गुरुमाऊली श्री.नृसिह सरस्वती स्वामी यांचे संस्थान, श्रीगुरूमंदिर या नावाने ओळखले जात असून,सध्या ह्या संस्थानचा समावेश महाराष्ट्र शासनाच्या "अ" श्रेणी तिर्थश्रेत्रामध्ये करण्यात आलेला आहे.येथे श्री.दत्तजयंती पोर्णिमे पासून श्री गुरुप्रतिपदेपर्यंत फार मोठा महाउत्सव सुद्धा पार पडतो. त्यामुळे सरसंघचालकापासून तर देशातील अनेक केन्द्रिय मंत्री, मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, राज्यपाल,खासदार,आमदार येथील स्वामी श्री गुरुमाऊली वरील नितांत श्रध्देपोटी श्री गुरुचरणी लिन होण्याकरीता येत असतात.

उल्लेखनिय म्हणजे केन्द्रिय मंत्री नितीनजी गडकरी, उपमुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस हे तर स्वामींचे निस्सीम भक्त असून ते कुळाचार पार पाडण्या करीता येथे श्रीगुरुदर्शनाला नेहमीच येत असतात. आज गुरुवार दि. 23 नोहेंबर रोजी दुपारी 12 : 40 वाजता केन्द्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे सपत्निक श्री नृसिह सरस्वती स्वामी दर्शनार्थ आगमन झाले असून, त्यांनी कुळाचाराप्रमाणे श्री गुरुमाऊलींची पूजा अर्चना करीत श्री गुरुमाऊलीचे दर्शन घेऊन, "ईश्वरचरणी नम्रता पूर्वक प्रार्थना, आम्हाला देशाच्या आणि समाजाच्या कल्याणाकरीता आशिर्वाद प्राप्त होवो हीच दत्तचरणी प्रार्थना" असल्याचे म्हटले.

यावेळी स्थानिक श्री गुरुमंदिर संस्थानतर्फे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ, सन्मानपत्र व श्री गुरु प्रतिमा देऊन त्यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी वाशिम यवतमाळ लोकसभा मतदार संघाच्या खासदार भावनाताई गवळी, कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाध्यक्ष, शहरअध्यक्ष ललित चांडक, तालुकाध्यक्ष डॉ राजीव काळे, स्विय सहायक संजय भेंडे, व स्थानिक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.याप्रसंगी केंद्रिय मंत्री मा.नितीनजी गडकरी यांनी विश्वस्त मंडळीशी महाराष्ट्र शासनाने अ श्रेणी तिर्थक्षेत्र म्हणून समावेश केलेल्या संस्थानची माहिती जाणून घेत संस्थानचा तिर्थक्षेत्र विकास आरखड्यानुसार जास्तीतजास्त विकास करण्या बाबत आश्वासित केले.त्यांच्या आगमनानिमित्ताने पोलीस अधिक्षक बच्चनसिहजी यांच्या आदेशाने,स्थानिक उपविभागीय पोलीस अधिकारी जगदिश पांडे यांचे मार्गदर्शनात,कारंजा शहर पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला यांचे नेतृत्वात पोलीस दल,राखीव पोलीस दल, दंगा नियंत्रण पथक,गृहरक्षक दल इ .कडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता. असे वृत्त महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी कळविले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....