वाशिम : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त रन फॉर लेप्रसी मॅरेथॉनचे आयोजन 30 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, अकोला नाका, वाशिम येथे करण्यात आले आहे. या मॅरेथॉन स्पर्धेत माध्यमिक शाळा व महाविद्यालयाचे विद्यार्थी, सर्वसामान्य नागरीक (महिला व पुरुष), कुष्ठरोगाबाबत कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, शासनाचे विविध विभाग, डॉक्टर संघटना, पुरस्कार प्राप्त खेळाडू, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती यांचा समावेश राहणार आहे. या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक येणाऱ्यास पारितोषिक देण्यात येणार आहे.
पुरुषांकरीता मॅरेथॉन मार्ग पुढीलप्रमाणे आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, अग्निशमक केंद्र, डॉ. देशमुख दवाखाना, बसस्टँड, आंबेडकर चौक, पाटणी चौक, अकोला नाका व समारोप जिल्हा सामान्य रुग्णालय. महिलांकरीता मॅरेथॉन मार्ग जिल्हा सामान्य रुग्णालय, अग्निशमक केंद्र, डॉ. देशमुख दवाखाना, बसस्टँड, अकोला नाका व स्पर्धेचा समारोप जिल्हा सामान्य रुग्णालय येथे करण्यात येणार असल्याचे आरोग्य सेवा (कुष्ठरोग) चे सहाय्यक संचालक यांनी सांगीतले असल्याचे संजय कडोळे यांनी कळविले आहे.