अकोला जिल्ह्यात 18 जुलै पासून आज 23 जुलै पर्यंत मोठ्या प्रमाणात सर्व दूर अतिवृष्टी झाली, अतिवृष्टीच्या नुकसानी बाबत जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस हे लक्ष ठेवून आहेत , पालकमंत्र्यांनी अकोला जिल्ह्यासाठी एन डी आर एफ टीम पाठवल्याबद्दल आमदार रणधीर सावरकर यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केले आहे.
जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना आणि जिल्हा प्रशासनाला सतर्क करून शेतकरी, नागरिक, ग्रामस्थ, व्यापारी यांच्या नुकसानीबाबत सर्वेक्षण करून पंचनामा करून नुकसानाचा आर्थिक अहवाल शासनाला तातडीने सादर करण्याच्या सूचना दिल्या, अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी मागील ३ दिवसात अकोला पूर्व मतदार संघाशिवाय जिल्ह्यातील इतरही पूर परिस्थितीचा पाहणी करून नुकसानीचा अंदाज घेतला, तालुक्यातील घुसर , अंबिकापुर, आपातापा या गावांना जोडणाऱ्या पुलांची झालेल्या हानी व दुरुस्ती साठी अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली , शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे गेलेले, पाणी शिरल्याने पिकाचे झाले नुकसान तसेच खरडून गेलेल्या जमिनी, याशिवाय अकोला शहरात मोर्णा नदीचे पाणी नागरी वस्तीत शिरल्याने नुकसानीचे पाहणी व नागरिकांच्या भेटी व संपर्कबाबत आमदार सावरकर यांनी सतत फिरून लोकांची भेट घेऊन त्यांना शासनाकडून तातडीने नुकसान भरपाई देण्यात येईल याकरिता आश्वासन दिले, अकोला शहरातील व्यापारी संकुल, किराणा बाजार , शिवसेना वसाहत उमरी कबीर नगर नायगाव, लक्ष्मी नगर, भुलेश्वर, खोलेश्वर, प्रभात पाच प्रभात 13 प्रभाग तीन प्रभाग एक प्रभाग वीस, 17 प्रभाग 9 हरिअर पेठ मेहरे नगर राजेश्वर नगर गीता नगर , नदी काठावरील आपदग्रस्त भागातील नागरी वस्तीचा दौरा करून नुकसानी बाबतची माहिती जिल्हा प्रशासन तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांना अवगत केली तालुका जिल्हाधिकारी तालुका दंडाधिकारीच्या वतीने नुकसान सर्वेक्षणासाठी व मदतीसाठी पथके निर्माण करून सर्व पथकांना नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी तसेच पंचनामा करून आर्थिक नुकसान अहवाल शासनास सादर मोक्याववर रवाना केले आहे.
सातत्याने आमदार सावरकर आपल्या सहकाऱ्यांसोबत पाहणी करून प्रशासन व सरकारमध्ये दुत म्हणून, कार्य करून जनतेला दिलासा देण्याचे काम करत आहे.
विज वितरण कंपनीला सुद्धा युद्ध स्तरावर काम करण्याची निर्देश आमदार सावरकर यांनी दिले आहे. महसूल कृषी आणि जिल्हा परिषद यांनी संयुक्त पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी सूचना दिली आहे
आपल्या प्रतिक्रिया द्या....