वाशिम (जिल्हा प्रातिनिधी संजय कडोळे) : जागतिक सायकल दिनानिमित्त जिल्हा न्यायालय येथे नुकतेच सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. सायकल रॅलीला निवासी उपजिल्हाधिकारी नितीन चव्हाण यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्ही. ए. टेकवाणी, मुख्य लोक अभिरक्षक परमेश्वर शेळके, सरकारी अभियोक्ता आरु, सहाय्यक लोक अभिरक्षक हेमंत इंगोले, जिल्हाधिकारी कार्यालयातील लेखाधिकारी युसूफ शेख व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाचे कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.