कारंजा (लाड) : सेवाव्रती आदर्श जय भारत सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून,गेल्या जवळ जवळ पंचवीस वर्षापासून,शैक्षणिक,सांस्कृतिक,सामाजिक,आरोग्यविषयक,पर्यावरणवादी, धार्मिक,आध्यात्मिक कार्यात हिरीरीने अग्रेसर राहणाऱ्या,डॉ ज्ञानेश्वर भगवान गरड यांनी,आदर्श सेवाभावी संस्थेच्या माध्यामातून आजपर्यंत लहानमोठे हजारो कार्यक्रम वेळोवेळी यशस्वीपणे पार पाडलेले आहेत.नुकतेच त्यांनी आपल्या संस्थेकडून शेलूवाडा येथील बँ.रामराव आदिक महाविद्यालयाला मुलांना क्रिडांगणात बैठकी करीता बेंचांची भेट दिल्याबद्दल संस्थाचालक, प्राचार्य व शिक्षकवृंद आणि शेलूवाडा ग्रामस्थाकडून त्यांचे आभार मानण्यात आले आहे.