31 जुलै 2022 रोजी अमरावती येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अमरावती जिल्हा पदाधिकारी संवाद बैठक संपन्न झाली.
या सभेचे अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.डॉ बबनराव तायवाडे हे होते.
सदर सभेत वरूड तालुका राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष व वरुड तालुक्यातील प्रत्येक गावात ओबीसी समुदायातील प्रत्येक तरुणांना आपलेसे वाटणारे नेतृत्व प्रवीण वानखडे यांचा भावपूर्ण सत्कार डॉ.बबनराव तायवाडे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.
याप्रसंगी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय सहसचिव मा. शरद वानखेडे, राष्ट्रीय युवा अध्यक्ष मा.सुभाष घाटे, राज्याचे उपाध्यक्ष मा.प्रकाशदादा साबळे, व राज्य महिला आघाडीच्या अध्यक्षा कल्पनाताई मानकर, जिल्हा अध्यक्ष अनिल ठाकरे उपस्थित होते.