आरमोरी:
दिनांक २० आँगस्ट २०२२ रोजी श्रीमती. वत्सलाबाई वनमाळी स्कूल ऑफ स्कॉलर आरमोरी येथे मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री नितीन कासार यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमी वर मार्गदर्शन केले व शाळेच्या शिक्षिका नूतन शेंडे व नयमा पठाण यांनी पाळणा गीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. वर्ग ८वी ची विद्यार्थिनी कुमारी प्रियांशू वाडणकर,वर्ग ९ची विद्यार्थिनी कुमारी कुमुदिनी माकडे व कुमारी काव्या ठवकर आणि वर्ग १०ची विद्यार्थिनी कुमारी भाग्यश्री शेंडे यांनी श्री कृष्ण जन्माबद्दल माहिती दिली. त्यानंतर वर्ग ७वीच्या विद्यार्थिनी कुमारी केतकी माकडे, कुमारी पूर्वा हेमके, कुमारी वैष्णवी पिंपळकर ,कुमारी रुद्धि कुंभारे ,कुमारी आश्लेशा मडावी यांनी "अच्युतम केशवम" हे खुप सुंदर गीत गाऊन उपस्थितांकडून योग्य प्रतिसाद मिळवला. तसेच वर्ग ८वी आणि ६वीच्या विद्यार्थिनी कुमारी सृष्टी कुथे, कुमारी सृष्टी बोरकर, कुमारी प्रियांशू वाडणकर ,कुमारी रिया भोयर,कुमारी सुजाता कुकडकर, कुमारी धानवी मने, कुमारी मारिया वलके, कुमारी आचल जीभकाटे आणि कुमारी सिद्धी सयाम यांनी "राधा क्यों गोरी मैं क्यों काला" हे गीत सादर केले आणि कार्यक्रम कार्यक्रमात रंगत आणली. वरील दोन्ही गीतांचे संयोजन संगीत शिक्षक श्री हेमंत खोब्रागडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात "राधा कैसे ना जले"या गीतावर नृत्य सादर करून विद्यार्थिनी कुमारी सोनल अलोने,कुमारी मृदानी खोब्रागडे , कुमारी नव्या म्हस्के,कुमारी माही शेंडे,कुमारी किमया अद़लवार, कुमारी श्रिया सपाटे,कुमारी अवनी मडावी, कुमारी सिद्धी सयाम, कुमारी आचल मेश्राम, कुमारी प्रियांसी खोब्रागडे,कुमारी पूर्वा हेमके कुमारी श्रुती कुभांरे, वैष्णवी पिंपळकर,कुमारी केतकी माकडे यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. या विविध रंगारंग कार्यक्रमांसोबतच दहीहंडी चा सुद्धा कार्यक्रम घेण्यात आला. या करिता वर्ग ९वी व १०वीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी मानवी मनोरे तयार करून दहीहंडी फोडली. तसेच सर्व उपस्थितांना व विद्यार्थ्यांना गोपालकाल्याचे वितरण करून या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन सौ सविता पानसे यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेच्या सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख सौ.विद्या राखडे आणि सहकारी शिक्षक वृंद यांनी अथक परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन श्री रविकांत म्हस्के यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शाळेचे शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी व पालक यांनी सहकार्य केले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....