कारंजा : कोव्हिड१९-कोरोना महामारीमुळे खंडीत झालेली,कारंजा (लाड) येथील जय भवाणी जय मल्हार वारकरी मंडळाचे दिंडी प्रमुख हभप संजय महाराज कडोळे यांनी आपली नियमीत वारी पुनश्च सुरू केली असून, महाराष्ट्रातील व्यसनमुक्ती समाज प्रबोधनाचे महाविद्यापिठ असलेल्या, जागृत संस्थान - वैराग्यमुर्ती व्यसनमुक्ती सम्राट थोर संत प.पू. श्री. शेषराव महाराज यांच्या दर्शनाने आज पुनश्च सुरु केली आहे. यामध्ये महत्वाचा मुद्दा असा की, याच संताच्या आध्यात्मिक महाविद्यापिठामधून व्यसनमुक्ती समाज प्रबोधनाचे धडे घेऊन हभप संजय महाराज कडोळे यांनी आपल्या "खानदानी परंपरागत गोंधळ जागरण" कार्यक्रमातून व्यसनमुक्ती समाज प्रबोधन सुरू केले असून, संत प.पू . श्री शेषराव महाराजांच्या कृपाशिर्वाद व साक्षात्काराने त्यांनी अनेक व्यक्तिंची दारूची व्यसने सोडविली आहेत. आणि म्हणूनच त्यांच्या व्यसनमुक्ती कार्याचा लेखाजोखा बघून महाराष्ट्राचे तत्कालिन सामाजिक न्याय मंत्री ना. राजकुमार बडोले यांनी जि प वाशिमचे माजी उपाध्यक्ष देवेन्द्र पाटील ताथोड यांच्या शिफारशी वरून त्यांना सन २०१८-२०१९ चा महाराष्ट्र शासनाचा व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार देऊन, सामाजिक न्याय मंत्रालयाकडून गौरवांकित केलेले होते. परंतु आपल्या ह्या पुरस्काराचे श्रेय ते व्यसनमुक्ती सम्राट प. पू. श्री शेषराव महाराज संस्थानला देत असतात. व नित्यनेमाने शिरपूर येथील वारी करीत असतात. महाराजांच्या आशिर्वादानेच त्यांनी कित्येक व्यक्तिची दारू सोडलेली आहे .
त्यांच्या या वारीमध्ये त्यांनी व्यसनमुक्त केलेली सर्वात प्रथम असलेली व्यक्ति सुद्धा त्यांच्या सोबत होती. "व्यसनाधिन माणसाने मनावर ताबा ठेवून, स्वेच्छेने दारू सोडण्याची इच्छा मनासी बाळगली तर आध्यात्मिक व मानसिक अभ्यासाने ती व्यक्ति १००% व्यसनमुक्त होते" आणि "दारू सोडा ..! संसार जोडा !!" हे महाराजांचे ब्रिद कायम लक्षात घेतले तर ती व्यक्ती आपल्या आयुष्यात कायम स्वरूपी सुखी - समाधानी - आनंदी होते. असे या प. पू. शेषराव महाराजांचे वचन असल्याचे प्रसार माध्यमाद्वारे त्यांनी सांगीतले. यावेळी त्यांचे सोबत वारीमध्ये दिनेश अढाऊ आणि सुधाकर इंगोले हे होते. वारीमध्ये त्यांनी चिखली (बुलडाणा ) येथील श्री रेणुका मातेचे सुद्धा दर्शन घेतले. "विश्वास म्हणजेच जीवन असून, संशय धरणे मृत्यु असतो"असे सांगतांना - नास्तिक आणि अंधश्रध्दा निर्मूलनाच्या नावावर विज्ञान प्रयोग करणारे विरोधक सुद्धा, शिरपूरच्या व्यसनमुक्ती महाविद्यापिठात नतमस्तक होत असल्याचे आणि खात्रीने स्वतः चांगले अनुभव घेत असल्याचे वृत्त त्यांनी कळवीले आहे. याप्रसंगी त्यांचे सोबत वारी मध्ये दिनेश अढाऊ आणि सुधाकर इंगोले हे हजर होते.