वृद्ध व्यक्ती सकाळच्या दरम्यान टिवि लावन्यासाठी गेला होता बाजूला कुलर असल्याने त्याचा हात कुलर ला लागला कुलरचा रिटन करंट त्याला लागला तो खाली पडला त्यातच त्याचा मृत्यु झाला मृतक व्यक्तीचे नाव दौलत विठोबा सातपुते वय ६५ वर्ष शहरातील गांधी वार्ड येथी रहीवासी आहे. हि घटना सोमवार ला सकाळी ११ वाजता घडली. रविवार च्या रात्री कुलर चा करंट पत्नी ला लागला होता सोमवार ला कुलर दुरस्त करू असे मृतकाने पत्नी ला म्हटले होते मृतक सकाळी आंघोळ करून टि वि चालू करन्याकरीता इलेक्ट्रीक बोर्ड जवळ गेला टिवि चा प्लग बोर्ड मध्ये टाकला त्याचा हात बंद असलेल्या कुलर ला लागला कुलरचा रिटन करंट मृतका ला बसला तो खाली कोसळला पत्नीने आरडा ओरड केली जवळच्या नातेवाहीकानी मृतकाला उप जिल्हा रुग्णालयात दाखल केले डॉक्टारांनी त्याला मृत घोषीत केले पोलीसांनी मर्ग दाखल केला पूढील तपास चिमूर पोलीस करीत आहे.