वाशिम वत्सगुल्म नगरीतील, मालेगावमार्गे अकोला रोडजवळच्या, समर्थनगर येथील श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर, समर्थनगर वाशिम येथे, सालाबादप्रमाणे यंदाही, ब्रम्हांडनायक स्वामी समर्थ जयंतीत्सवानिमित्त,चैत्र शु प्रतिपदा गुडीपाडवा बुधवार दि २२ मार्च आणि चैत्र शु द्वितीया गुरुवार दि २३ मार्च रोजी दोन दिवशीय उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवा दरम्यान पहिल्या दिवशी २२ मार्च रोजी रात्री ७ : ३० ते १०: ०० वाजेपर्यंत, किर्तनकेसरी असलेले मेहकर येथील सुप्रसिद्ध किर्तनकार हभप.संजय महाराज देशमुख यांचे किर्तन होईल तर दुसरे दिवशी गुरुवार २३ मार्च रोजी सकाळी १०:०० ते १२ : ०० वाजेपर्यंत वाशिम येथील श्रीमदभागवतकथाप्रवक्ते, भागवताचार्य हभप. नामदेव महाराज काकडे यांचे गोपालकाल्याचे किर्तन होईल . या किर्तन कार्यक्रमाला गायनाचार्य विदर्भभूषण हभप. मनोहर महाराज कोठेकर, गायनाचार्य हभप विठ्ठल महाराज (सुलदली), मृदंगाचार्य, तालसम्राट हभप गजानन महाराज कव्हर तामसीकर आणि हभप हरीबाप्पू महाराज वारकरी शिक्षण संस्था कोठा येथील वारकरी मंडळीची साथसंगत मिळणार आहे. गोपालकाल्याच्या किर्तनानंतर दुपारी १:०० ते सायंकाळपर्यंत भव्य अशा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे .
तरी पंचक्रोशीतील ब्रम्हांडनायक स्वामी भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा समिती समर्थनगर वाशिम तथा रहिवाशी समर्थनगरवाशीयांनी केले आहे असे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेला मिळाल्याचे संजय कडोळे यांनी कळविले आहे.